अभिनेता करणार 51 व्या वर्षी दुसरे लग्न, अनेक मुलींना करतोय डेट?, मोठा खुलासा
बिग बॉस ओटीटी 3 नंतर एक नाव तूफान चर्चेत आले. ते नाव दुसरे तिसरे कोणाचेही नसून रणवीर शाैरी हे आहे. रणवीर शाैरी यांनी अभिनय क्षेत्रामध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे रणवीर शाैरीची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

यंदाचे बिग बॉस ओटीटी 3 चे सीजन धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ होती. अनेक दिग्गज नावे या सीजनमध्ये सहभागी झाली होती. अभिनेता रणवीर शाैरीने तर या सीजनमध्ये धमाका केला. रणवीर शाैरीच बिग बॉस ओटीटीचा विजेता होईल, असे सर्वांनाच वाटत होते. रणवीर शाैरी बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशीपासून चांगलाच गेम खेळताना दिसलाृ. मात्र, सना मकबूल ही बिग बॉसची विजेता झाली. रणवीर शाैरीने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, आपण कोणत्याही पीआरकडे आपले काम न देताच बिग बॉसमध्ये सहभागी झालो होतो.
विशेष म्हणजे रणवीर शाैरी आणि अरमान मलिकची एक चांगलीच मैत्री बिग बॉसच्या घरात बघायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक हा रणवीर शाैरीला व्हिडीओ कॉलमध्ये बोलताना दिसला. पायल मलिक हिच्या व्लॉगमध्ये याचा व्हिडीओ दिसला. रणवीर शाैरी बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून सतत मोठे खुलासे करताना दिसत आहे.
आता नुकताच रणवीर शाैरीने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे रणवीर शाैरीकडून करण्यात आले. रणवीर शाैरीचे लग्न 2010 मध्ये कोंकणा सेन शर्मासोबत लग्न झाले. लग्नाच्या दहा वर्षांनंतर यांच्यामध्ये घटस्फोट झाला. रणवीर शाैरीला एक मुलगा देखील आहे.
51 वर्षांचे रणवीर शाैरी हे आता डेट करत आहे. डेटिंगबद्दलचा खुलासा रणवीर शाैरीने त्याच्या मुलाखतीमध्ये केला आहे रणवीर शाैरीला विचारण्यात आले की, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणी आहे का? यावर रणवीर शाैरी हसत हसत म्हणाले की, आता तरी कोणी नाहीये…मी सध्या फ्रिलांसिंग करत आहे. यावर रणवीर शाैरीला विचारण्यात आले की, रिलेशनशिपमध्ये कसे फ्रिलांसिंग?
पुढे विचारण्यात आले की, ते कोणत्या एका व्यक्तीला नाही तर त्यापेक्षा जास्त व्यक्तींना डेट करत आहे का? यावर रणवीर शाैरीने म्हटले की, मी यावर काहीच कमेंट करू इच्छित नाहीये. पुढे रणवीर शाैरीने म्हणाले की, होय मी डेट करत आहे…पण.. मी सीरियस रिलेशनशिपमध्ये नाहीये. रणवीर शाैरीला 13 वर्षांचा मुलगा देखील आहे.
