Ankita Lokhande | त्या घरात मी नेहमीच… सासरच्यांविषयी अंकिता लोखंडे असं का म्हणाली ?

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही बरीच लोकप्रिय आहे. ' बिग बॉस 17' मध्ये पती विकी जैनसोबत गेल्यानंतर तिची पर्सनल लाईफ खूपच चर्चेत आली. त्या घरात पतीसोबत झालेली भांडणं, तिच्या सासूने केलेली वक्तव्यं, यामुळे अंकिता आणि तिच्या सासरच्यांच नात खूप जज करण्यात आलं. या शोच्या फॅमिली वीकमध्ये तिची सासू आली होती, तेव्हा त्या अंकिताला उद्देशून असं काही बोलल्या जे बऱ्याच प्रेक्षकांना आवडलं नाही

Ankita Lokhande | त्या घरात मी नेहमीच... सासरच्यांविषयी अंकिता लोखंडे असं का म्हणाली ?
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:40 PM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही बरीच लोकप्रिय आहे. ‘ बिग बॉस 17’ मध्ये पती विकी जैनसोबत गेल्यानंतर तिची पर्सनल लाईफ खूपच चर्चेत आली. त्या घरात पतीसोबत झालेली भांडणं, तिच्या सासूने केलेली वक्तव्यं, यामुळे अंकिता आणि तिच्या सासरच्यांच नात खूप जज करण्यात आलं. या शोच्या फॅमिली वीकमध्ये तिची सासू आली होती, तेव्हा त्या अंकिताला उद्देशून असं काही बोलल्या जे बऱ्याच प्रेक्षकांना आवडलं नाही. एवढचं नव्हे तर शो च्या बाहेर आल्यावरही विकीची आई आणि अंकिताच्या सासूबाई असं काही बोलल्या जे बऱ्याच लोकांना रुचलं नाही. पण आता बिग बॉस हा शो संपला असून अंकिता लोखंडेदेखील बाहेर आली आहे. तिने याच सर्व मुद्यांवर भाष्य केलं आहे.

खरंतर फॅमिली वीकमध्ये थेरपी रुममध्ये विकी जैनची आईन, सूनबाई अंकिताशी एकट्याच बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अंकिताच्या पालनपोषणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अंकिता बरीच दुखावली गेली होती.बाहेर आल्यावरही अंकिताच्या सासूने मीडियाशी बोलताना सांगितलं, त्यांचं कुटुंब अंकिता-विकीच्या लग्नाच्या विरोधात होतं. एवढंच नव्हे तर त्या असंही म्हणाल्या की हिरॉईनशी लग्न करायचं म्हटलं की बराच खर्च होतो, तिचे बरेच नखरे सहन करावे लागतात.

काय म्हणाली अंकिता ?

हे सुद्धा वाचा

आता अंकिताने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्व बाबींवर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ आत्तापर्यंत लोकांनी त्यांची धारणा बनवली आहे. त्यांना जे बोलायचं होतं, ते बोललं गेलं, ते मी थांबवू शकत नाही. कारण त्यावेळी जे झालं ते सगळ्यांसमो झालं. पण हा माझ्या कुटुंबाचा (वैयक्तिक) प्रश्न आहे. मला जर काही बोललं गेलं असेल तर त्यांचा तसा उद्देश नव्हता हे मला माहीत आहे. कुटुंबाच्या निगेटीव्ह इमेजबद्दल बोलायचं झालं तर ती प्रोटेक्ट करण्यासाठी मी आता इथ आहे. मी हे सांगू इच्छिते की, त्या घरात मी नेहमीच खुश असते,’ असं अंकिताने नमूद केलं.

‘ आज मी खूप खुश आहे आणि भविष्यात देखील असंच राहील. लोक काय बोलतात, याबद्दल मी काहीच करू शकत नाही. तेव्हा त्यांनी ( अंकिताची सासू) विकीला पहिल्यांदा रडताना पाहिलं होतं, तो खूप स्ट्राँग आहे पण तो जेव्हा असा रडू लागला,ते पाहून त्यांचं मन दुखावलं. म्हणूनच त्या असं बोलल्या असू शकतात. पण त्याने काहीच फरक पडत नाही. मी जेव्हा शोमधून बाहेर आले तेव्हा मला काही प्रश्न, काहीच जाब विचारण्यात आला नाही. आता सगळं ठीक आहे, पुन्हा त्याच विषयावर बोलून मला त्यांची नाचक्की, अपमान करायचा नाही. आम्ही दोघेही आता ते सगळं विसरलो आहोत,’ असं अंकिताने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.