New Entry | नव्या वर्षात धमाका करायला ‘दीपिका पादुकोण’ तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

New Entry | नव्या वर्षात धमाका करायला 'दीपिका पादुकोण' तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. दीपिका धूम 4 (Dhoom 4) मध्ये लवकरच दिसू शकते. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण या चित्रपटात स्टाईलिश चोरणीची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी दीपिकाबरोबर चर्चा सुरू आहे. मात्र, सध्या दीपिकाचे वेळापत्रक व्यस्त आहे. दीपिका शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. (Actress Deepika Padukone may appear in Dhoom 4)

रिपोर्टनुसार जॉन अब्राहम पठाण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते. दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओन्ली लव्ह लिहिले होते, दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

रणबीर कपूर -आलिया भट्ट आणि रणवीर सिंग -दीपिका पादुकोण यांनी राजस्थानच्या रणथंभोरमध्ये 2021 चे स्वागत केले. यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अगोदरच या सर्वांच्या बातम्यांबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते, यामुळे या सर्वांनासोबत बघून त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

मात्र, या सर्वांनीसोबत जाण्याचा रणथंभोरमधील प्लॅन ठरवला होता की, फक्त हा योगायोग आहे याची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगत होती. रणथंभोरमध्ये जाण्याची प्लॅन अगोदर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा होता. दीपिकाने कुटुंबीयांसोबत रणथंभोरला जाण्याचा प्लॅन आखला होता. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनिशासुद्धासोबत होते.

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसांसाठी सेगवेचे अक्षय कुमारच्या उपस्थिती लॉन्चिंग, मात्र चर्चा अक्षयच्या खास ट्राऊझरची!

Shocking : ड्रग्ज केसमध्ये सारा अली खानचं नाव, हातातून गेला दूसरा मोठा चित्रपट!

(Actress Deepika Padukone may appear in Dhoom 4)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI