अभिनेत्रीचा संताप, नऊ महिन्यानंतर भडकली, धर्मासाठी बॉयफ्रेंडलाही…
अभिनेत्री हिमांशी खुराना ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. हिमांशी खुराना हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. हिमांशी खुराना आणि आसिम रियाज हे एकमेकांना डेट करत होते. पहिली भेट बिग बॉसच्या घरात झाली.

अभिनेत्री हिमांशी खुराना हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. हिमांशी खुरानाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिमांशी बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाली. यावेळी मस्त गेम खेळतानाही हिमांशी खुराना ही दिसली. हिमांशी खुराना आणि आसिम रियाज यांची पहिली भेट ही बिग बॉसच्या घरातच झाली. हिमांशी खुराना आणि आसिम बिग बॉसच्या घरात असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. 2023 मध्ये यांनी ब्रेकअप करत असल्याचे जाहीर केले. ब्रेकअपचे कारणही यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. दोघांचेही धर्म वेगळे असल्यामुळे आपण ब्रेकअप करत असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
हिमांशी खुराना हिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आसिम रियाज याचे काही फोटो व्हायरल होताना दिसले. या फोटोमध्ये आसिम रियाज हा चक्क एका मुलीसोबत वेळ घालताना दिसला. या मुलीने आसिम रियाज याच्या खांद्यावर डोके ठेवल्याचेही बघायला मिळाले. हिमांशी खुराना हिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर परत एकदा आसिम प्रेमात पडल्याचे सांगितले गेले.
आता हिमांशी खुराना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट पाहून असे स्पष्ट होत आहे की, हिमांशी खुराना हिच्या निशाण्यावर आसिम रियाज हा आहे. हिमांशी खुराना हिच्या पोस्टमध्ये म्हणण्यात आले की, सशक्त महिला नेहमीच अशा पुरुषांना आकर्षित करतात ज्यांना उपचारांची आवश्यकता असते… मात्र, हिमांशीने दुसरी लाईन कट केली आणि त्याऐवजी लिहिले की, सशक्त महिला आता रुग्ण स्वीकारत नाहीत…
हिमांशी खुराना हिने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव लिहिले नाहीये. मात्र, हिमांशी खुराना हिने ही पोस्ट आसिम रियाज याच्यासाठीच लिहिल्याचे सांगितले जातंय. ब्रेकअपच्या तब्बल आठ महिन्यांनंतर त्यामधून हिमांशी खुराना ही बाहेर पडताना दिसत आहे. आसिमसोबतचे ब्रेकअप हिमांशी खुराना हिच्यासाठी नक्कीच मोठा धक्का होता.
हिमांशी खुराना आणि आसिम रियाज यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, हिमांशी खुराना आणि आसिम रियाज हे लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, अचानकपणे त्यांच्या ब्रेकअपची चर्चा ही रंगताना दिसली. हिमांशी खुराना आणि आसिम रियाज यांच्या लव्ह स्टोरीला बिग बॉसच्या घरापासूनच सुरूवात झाली होती.
