Suraj Chavan Wedding : जान्हवी किल्लेकरचं मोठं मन, सूरज चव्हाणला दिलं महागडं गिफ्ट, पाहून सगळेच थक्क!
सूरज चव्हाणने संजनासोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नात जान्हवी किल्लेकरने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जान्हवीने सूरजला एक खास भेट दिली आहे.

Suraj Chavan Wedding : बिग बॉस मराठीच्या सिझन 5 चा विजेता सुरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याच्या पत्नीचे नाव संजना असून त्याने आता आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरवात केली. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची राज्यभरात चर्चा होती. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. दरम्यान, त्याच्याल लग्नात फुल्ल धमाल करताना दिसलेल्या जान्हवी किल्लेकरच्या गिफ्टची महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे. तिने सुरजला एक खास गिफ्ट दिलं आहे.
जान्हवी किल्लेकर उत्साहाने झाली सहभागी
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाणसोबत जान्हवी किल्लेकर ही देखील एक स्पर्धक होती. त्या सिझनदरम्यान टास्क पूर्ण करताना जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण अनेकदा एकमेकांसमोर आले. त्यांच्यात वादही झाले. पण सिझनमधील सर्व वाद विसरून जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या विवाहसोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभागी झाली. विशेष म्हणजे फक्त विवाह सोहळाच नव्हे तर तिने सूरज-संजनाच्या हळदी समरंभातही हजेरी लावली. सूरजला हळद लवताना जान्हवी धम्माल मस्ती तसेच डान्स करताना दिसली. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यादरम्यानदेखील जान्हवी किल्लेकर सूरजसोबतच दिसली. तिने वरातीत मोठ्या उत्साहात डान्स केल. सूरजला ती वेळोवेळी मार्गदर्शनही करताना दिसली. या लग्नामध्ये जान्हवीने सूरजला खूपच महागडं असं गिफ्ट दिलं आहे.
View this post on Instagram
जान्हवीने सूरजला काय गिफ्ट दिलं?
जान्हवी किल्लेकरने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये जान्हवी सूरज-संजनाला आशीर्वाद देतानाद दिसत आहे. सोबतच तिने सूरजसोबत काही फोटोदेखील काढले आहेत. तिने सूरजला एक सोन्याची अंगठी गिफ्ट दिले आहे. तिने स्वत: सूरजच्या बोटामध्ये ही अंगठी घातली. या अंगठीची किंमत हजारो रुपये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जान्हवीने सूरजला दिलेल्या याच गिफ्टची महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सूरजच्या लग्नाची राज्यात चर्चा होती. त्याची होणारी बायको कोण असेल? असे विचारले जात होते. त्यानंतर आता सूरजने संजनासोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडीला महाराष्ट्रभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
