कंगना राणावत हिचे बॉलिवूडबद्दल हैराण करणारे विधान, म्हणाली, सर्वजण…

अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत ही आता खासदार झालीये. तिने लोकसभेची निवडणूक मंडी येथून लढवली. कंगना राणावत ही मोठ्या संपत्तीची मालकीनही आहे.

कंगना राणावत हिचे बॉलिवूडबद्दल हैराण करणारे विधान, म्हणाली, सर्वजण...
Kangana Ranaut
| Updated on: Aug 28, 2024 | 4:53 PM

अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे कंगना राणावत हिने मंडी येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती खासदार देखील झाली. चित्रपटासोबतच कंगना राणावत आता राजकारणात सक्रिय झाल्याचे बघायला मिळते. कंगना राणावत हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे कंगना ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. सतत काही ना काही पोस्ट शेअर करताना कंगना राणावत ही दिसते.

कंगना राणावत हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये कंगना राणावत ही काही मोठे खुलासे करताना दिसलीये. आता कंगना राणावतच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. कंगना राणावत हिने थेट बॉलिवूडबद्दल भाष्य केले आहे. कंगना राणावत हिने काही लोकांवर निशाना साधल्याचेही बघायला मिळतंय.

कंगना राणावत म्हणाली की, ते लोक सहा वर्षांपासून लपवत आहेत. मला चित्रपट क्षेत्राबद्दल काही बोलायचेच नाहीये. ही एक खूप जास्त होपलेस जागा आहे. मी माझे सर्व काही लावले. माझ्यावर केस केल्या गेल्या. ज्यावेळी माझे चित्रपट चालत नाहीत, त्यावेळी काही महिला आनंद साजरा करतात. मी एकसारखी फीस मिळावी यासाठी लढाई लढले आहे.

माझ्यामुळे त्यांना चित्रपट मिळाले. मी कोणी खान, कपूर आणि कुमारचे चित्रपट करत नाही. माझा जर आगामी चित्रपट चालला तर हे कोणी साधे दिसणार देखील नाहीत. हे पहिल्या नाही की, कंगना राणावत हिने बॉलिवूडबद्दल असे काही भाष्य केले असेल. नेहमीच कंगना ही बॉलिवूडच्या कलाकारांवर टीका करताना दिसते.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट तिच्या कायमच निशाण्यावर असतात. खासदार झाल्यानंतर कंगना राणावत हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला होता. चक्क विमानतळावरच कंगना राणावत हिच्या कानाखाली मारण्यात आली. त्यानंतर या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.