अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल कंगना राणावत हिचा मोठा खुलासा, थेट म्हणाली, मला फोन आणि…
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता कंगना राणावत हिने बॉलिवूडनंतर आपला मोर्चा हा राजकारणाकडे वळवला आहे. कंगना खासदार झालीये.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न काही दिवसांपूर्वी झाले. विशेष म्हणजे कित्येक महिने यांचे लग्न सुरू होते. मुंबईमध्ये अत्यंत खास पद्धतीने अनंत अंबानी आणि राधिका यांचा विवाहसोहळा झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक मोठ्या संख्यने पोहोचले होते. अनेक दिग्गज लोक यांच्या लग्नात सहभागी झाले. बॉलिवूडचे स्टार तर या लग्नात धमाल करताना दिसले. अनिल कपूर यांच्यापासून ते अनन्या पांडेपर्यंत सर्वजण अनंतच्या लग्नात डान्स करताना दिसले. अत्यंत महागडे गिफ्ट देखील काही बॉलिवूड कलाकारांना या लग्नात मिळाले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
अनंत आणि राधिका यांच्या लग्नात जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार हे सहभागी झाले. मात्र, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाकडे बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हिने पाठ फिरवली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. याबद्दल पहिल्यांदाच बोलताना आता कंगना राणावत ही दिसलीये.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना कंगना राणावत म्हणाली की, मला अनंत अंबानीचा फोन आला होता. अनंत अंबानी हा खूप जास्त छान मुलगा आहे. अनंतने मला म्हटले की, माझ्या लग्नात तुम्हाला यायचे आहे…मी अनंतला म्हटले, माझ्या घरातही लग्न आहे…माझ्या भावाचे लग्न आहे आणि हा दिवस माझ्यासाठी खरोखरच खूप जास्त मोठा आहे.
पहिल्यांदाच अनंत अंबानीच्या लग्नात न जाण्याबद्दल कंगना राणावत हिने खुलासा केला. हेच नाही तर अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन हे गुजरातमधील जामनगरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी देखील सर्वच बॉलिवूड कलाकार या फंक्शनमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी देखील कंगना राणावत या फंक्शनमध्ये दिसली नाही.
कंगना राणावत हिने लोकसभेची निवडणूक मंडी येथून लढवली आणि ती खासदार देखील झाली. कंगना राणावत ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. कंगना राणावत ही चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना देखील दिसते. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वी चांदीच्या ग्लासबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.