Thalaivi Trailer | कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा जयललितांच्या अभिनेत्रीपासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाची झलक…

आज (23 मार्च) ‘थलायवी’चा ट्रेलर (Kangana Ranaut) चाहत्यांसमोर सादर करण्यात आला आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Thalaivi Trailer | कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा जयललितांच्या अभिनेत्रीपासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाची झलक...
थलायवी
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:20 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘थलायवी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आज (23 मार्च) ‘थलायवी’चा ट्रेलर (Kangana Ranaut) चाहत्यांसमोर सादर करण्यात आला आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे (Actress Kangana Ranaut Thalaivi Trailer launch).

मंगळवारी (23 मार्च) रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती कंगनाने सोमवारी एका मोशन पोस्टरच्या माध्यमातून दिली होती. तेव्हापासूनच ट्रेलरविषयी उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढत चालली होती.

कसा आहे ट्रेलर?

ट्रेलर सुरू होतो ज्यामध्ये पार्श्वभूमीवर एक आवाज ऐकू येतो की, हा चित्रपट आपल्याला राजकारण कसे करावे हे सांगेल. त्यानंतर आपल्याला कंगनाची एक सुंदर झलक पाहायला मिळते. यानंतर कंगनाचे वेगवेगळे सीन दाखवण्यात आले आहेत. यानंतर असे संवाद ऐकू येतात की, ‘ये मर्दों की दुनिया है और हम एक औरत को आगे करके खड़ा है’. या दरम्यान जयललिता बनलेल्या कंगनाच्या राजकीय लूकची झलक दिसून येते.

यानंतर जयललिता यांची (कंगना रनौत) या ट्रेलरमध्ये जोरदार एंट्री आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यादरम्यान, कंगनाचा अतिशय सुंदर लूक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारे जयललिता यांचे एमजेआर बरोबरचे वैयक्तिक जीवन देखील अतिशय सुंदर पद्धतीने ट्रेलरमध्ये सादर केले गेले आहे (Actress Kangana Ranaut Thalaivi Trailer launch).

पाहा ट्रेलर

जयललिता यांनी राजकारणात कसा प्रवेश केला, हे या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दाखवले आहे. ट्रेलरमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची एक झलकदेखील समोर आली आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांना शिवीगाळ केल्याची घटनाही दर्शवली आहे. ट्रेलरमध्ये एक जोरदार संवाद आहे- ‘क्योंकि महाभारत का दूसरा नाम है जया आहे.’ 3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कंगना जयललिता यांचे जीवन अतिशय उत्तम पद्धतीने चित्रपटात सादर करत असल्याचे दिसते.

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत

कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. तिने लिहिले की, ‘जेव्हा ट्रेलर लाँचिंगसाठी केवळ एक दिवस दूर आहे, तेव्हा मी असे म्हणू शकते की काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’

(Actress Kangana Ranaut Thalaivi Trailer launch)

हेही वाचा :

पहिल्यांदाच दिसले सुशांतच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य! ‘छिछोरे’ला पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केला आनंद!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.