AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manisha Koirala on Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकताच मनिषा कोईरालाने केली पोस्ट, म्हणाली…

Manisha Koirala on Nana Patekar: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री मनिषा कोईरालाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Manisha Koirala on Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकताच मनिषा कोईरालाने केली पोस्ट, म्हणाली...
Nana Patekar and Manisha KoiralaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 9:38 AM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. त्यांनी आज पहाटे गोव्यातील घरी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नाना यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. अभिनेत्री मनिषा कोईरालाने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. आता नाना यांच्या निधनानंतर मनिषा कोईरालाला मोठा धक्का बसला आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, अभिनय क्षेत्रातील एका खऱ्या दिग्गज कलाकाराच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. चित्रपटसृष्टी आणि कलेतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे म्हटले आहे. मनिषा कोईरालाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Manisha Post

नाना पाटेकर यांचे नाव बॉलिवूडच्या वरिष्ठ अभिनेत्यांमध्ये घेतले जायचे. ८० च्या दशकापासून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे लोकांच्या मनात अढण स्थान मिळवले. या काळात त्यांच्या खासगी आयुष्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. असे म्हटले जाते की नाना आणि अभिनेत्री मनीषा कोइराला यांनी त्यावेळी सर्वांचे लक्ष वेधले होते. आता नाना यांच्या निधनानंतर मनिषा कोईरालाने दु:ख व्यक्त केले आहे.

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे कारण काय?

अभिनेते नाना पाटेकर यांना वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता मृत घोषित केले. काल नाना पाटेकर हे गोव्यातील त्यांच्या घरी होते. त्यांच्या अचानक छातीत तिव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले होते. ते घरात बेशुद्ध अवस्थेतच आढळले होते. त्यांना घरातच कार्डियाक मसाज देण्यात आली आणि त्यानंतर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण वैद्यकीय-कायदेशीर स्वरूपाचे असल्याने, आज शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?