AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toofaan : फरहान अख्तरच्या ‘तूफ़ान’मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूरचा मराठी ठसका, खास मराठी डायलॉग्सची मेजवानी

: 'बाटला हाउस' आणि 'सुपर 30' सारख्या हिट चित्रपटांनंतर, मृणाल ठाकुर लवकरच राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘तूफ़ान’ चित्रपटात झळकणार आहे. (Actress Mrunal Thakur's Marathi dialogues in Farhan Akhtar's 'Toofaan' movie)

Toofaan : फरहान अख्तरच्या 'तूफ़ान'मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूरचा मराठी ठसका, खास मराठी डायलॉग्सची मेजवानी
VN
VN | Updated on: Apr 08, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई : ‘बाटला हाउस’ आणि ‘सुपर 30’ सारख्या हिट चित्रपटांनंतर, मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) लवकरच राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘तूफ़ान’ चित्रपटात झळकणार आहे. फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल आणि सुप्रिया पाठक सारख्या कलाकारांसोबत, या स्पोर्ट्स ड्रामामध्ये प्रतिभाशाली कलाकारांची टीम दिसणार आहे. मृणाल आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामील झाली आहे आणि हा चित्रपट तिच्यासाठी अनेक कारणांनी खास आहे. (Actress Mrunal Thakur’s Marathi dialogue in Farhan Akhtar’s ‘Toofaan’ movie)

चित्रपटात मराठी भाषेत संवाद

या भूमिकेसोबत जोडून घेण्यासोबतच, या स्पोर्ट्स ड्रामाने मृणाल ठाकुरला आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये बोलण्याची संधी दिली आहे. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली की, “सर्वात चांगली गोष्ट ही आहे की अनन्या आणि मी दोघीही महाराष्ट्रीयन आहोत. तुम्ही मला या चित्रपटात मध्येच मराठी बोलताना बघाल आणि हे मराठी नैसर्गिकरित्या ओघात आलेलं मराठी आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश सरांसारखे कलाकार असतात जे मराठीत उत्तर देतात, तेव्हा तो एक छान संवाद असतो.”

ऑफस्क्रीन मृणाल अनन्यापासून प्रेरित

मृणाल सांगते की, “माझी व्यक्तिरेखा अनन्या न केवळ अज्जू (फरहान अख्तर) च्या जीवनात, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात देखील प्रेरक आहे. ती खूप उदार, समर्पित आणि दूरदृष्टि असलेली मुलगी आहे. ऑफ स्क्रीन, मी अनन्याकडून प्रेरित आहे आणि ज्या पद्धतिनं ती गोष्टी बघते मला तसं आयुष्यात राहायला आवडेल. अनन्याचा समानतेवर विश्वास आहे आणि जीवनातील तिचं उद्द्येष्य लोकांना प्रेरित करणे हेच आहे. आता, जेव्हा मी रोज सकाळी उठते, तेव्हा मी स्वत:ला विचारते की  मी इतरांना प्रेरित करण्यासाठी जगत आहे. मी एक कलाकार असल्यामुळे ही संधी खरोखरच सौभाग्यशाली समजते, जिथे मी मुक्याचा आवाज बनू शकते आणि माझ्या चित्रपटांच्या मध्यमातून आणि मी निवडलेल्या विषयांच्या माध्यमातून, राष्ट्राला प्रेरित करू शकते.”

चित्रपट 21 मे 2021 ला अमेझॉन प्राइमवर 

‘तूफ़ान’ची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली असून त्याचा प्रीमियर 21 मे 2021 ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘टकाटक गर्ल’ प्रणाली भालेरावचा अनोखा अंदाज, फोटो पाहाच

PHOTO | वाझे-देशमुख ‘सेटलमेंट’च्या पत्रात थेट शरद पवारांचा उल्लेख, वाचा सविस्तर प्रकरण

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...