AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीला खूनाच्या आरोपाखाली विमानतळावरच अटक, वाचा सविस्तर

बांग्लादेशी एक्ट्रेस नुसरत फारिया मर्डर केस में गिरफ्तार! शेख हसीना का रोल निभाकर हुई थीं मशहूर

प्रसिद्ध अभिनेत्रीला खूनाच्या आरोपाखाली विमानतळावरच अटक, वाचा सविस्तर
Nusrat Image Credit source: Social Media
| Updated on: May 18, 2025 | 7:49 PM
Share

प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया अडचणीत सापडली आहे. ‘मुझिब: द मेकिंग ऑफ ए नेशन’ या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटामध्ये तिने बांगलादेशी माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारून खूप प्रशंसा मिळवली होती. तिला ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, ही अटक जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनांदरम्यान खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणाशी संबंधित आहे.

नुसरत फारिया ही केवळ 31 वर्षांची आहे. प्रथम आलोक या वृत्तपत्रानुसार, अभिनेत्रीला थायलंडला जाताना इमिग्रेशन चेकपॉइंटवर अडवण्यात आले. तिच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एक खटला दाखल आहे. अभिनेत्रीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बांगलादेशातील आंदोलनांमुळे शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्या भारतात आल्या.

शेख हसीना यांची साकारली होती भूमिका

बड्डा झोनचे सहायक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी प्रथम आलोकला अभिनेत्रीच्या अटकेची पुष्टी केली. नुसरत फारियाला 2023 मधील ‘मुझिब: द मेकिंग ऑफ ए नेशन’ या चित्रपटात शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी खूप ओळख मिळाली होती. हा चित्रपट बांगलादेश आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नाने बनवला गेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केले होते.

बंगाली चित्रपटांमध्ये केले भरपूर काम

नुसरत फारिया अभिनयात करिअर करण्यापूर्वी रेडिओ जॉकी आणि प्रेझेंटर म्हणून काम करत होती. तिने 2015 मध्ये बांगलादेश-भारत सहयोगाने बनलेल्या ‘आशिकी: ट्रू लव’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक बांगलादेशी आणि भारतीय चित्रपटांमध्ये अभिनय केला. ती प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये दिसली. ती टेलिव्हिजन होस्टिंग आणि मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.