Prachi Desai | ‘मी देखील कास्टिंग काऊचला बळी पडले होते’, प्राची देसाईने सांगितली आपबिती!

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्री प्राची देसाईने (Actress Prachi Desai) आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.

Prachi Desai | ‘मी देखील कास्टिंग काऊचला बळी पडले होते’, प्राची देसाईने सांगितली आपबिती!
प्राची देसाई

मुंबई : छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्री प्राची देसाईने (Actress Prachi Desai) आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. 2006 मध्ये टीव्ही सीरियल ‘कसम से’ मधून मनोरंजन विश्वात डेब्यू केलेल्या प्राची देसाईने 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटाद्वारे फरहान अख्तरसह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम देखील केले आहे. मात्र, 2015नंतर अभिनेत्री मनोरंजन विश्वातून गायब झालेली दिसली आहे (Actress Prachi Desai Share Casting Couch experience during interview).

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच, प्राचीने सांगितली आपभीती

नुकतीच प्राची देसाईने एका मनोरंजन पोर्टलला मुलाखत दिली. यावेळी तिने बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच प्रकरणावर भाष्य केलं. तिने स्वत: बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचा सामना केल्याचे सांगितले. एक मोठा चित्रपट करण्यासाठी आपल्याला देखील तडजोड करण्यास सांगण्यात आल्याचे ती यावेळी म्हणाली.

भुमिकेसाठी तडजोड करण्यास सांगितले

यावेळी प्राची देसाई म्हणाली की, ‘माझ्याकडे खूप मोठ्या चित्रपटाची ऑफर होती, पण त्यासाठी मला तडजोड अर्थात कॉम्प्रोमाईज करण्यास सांगितले गेले. मी नकार दिला तेव्हा, दिग्दर्शकाने पुन्हा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला. पण मी स्पष्टपणे सांगितले की, मला हा चित्रपट करायचा नाही.’(Actress Prachi Desai Share Casting Couch experience during interview)

बॉलिवूडमध्ये भ्रष्टाचार आणि नेपोटीझम

बॉलिवूडमध्ये भ्रष्टाचार आणि नेपोटीझम असल्याचे देखील प्राची देसाई या मुलाखतीदरम्यान बोलली. प्राची देसाई म्हणाली की, ओटीटी हे नवे मध्यम आल्याचा मला आनंद आहे. कारण तिथे बरेच पर्याय आहेत आणि बघायला देखील खूप सामग्री आहे. प्राची देसाईकडे येत्या दोन महिन्यांत दोन मनोरंजक डिजिटल प्रोजेक्ट आले आहेत.

वेब विश्वात प्राची देसाईचा डेब्यू

अभिनेत्री प्राची देसाई हिने ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘अझर’, ‘लाइफ पार्टनर’ आणि ‘पोलिसगिरी’ अशा बॉलिवूड चित्रपट केले आहेत. प्राची देसाई हिने नुकताच ‘साइलेन्सः कॅन यू हियर इट’ या चित्रपटाद्वारे वेब विश्वात देखील प्रवेश केला होता.

(Actress Prachi Desai Share Casting Couch experience during interview)

हेही वाचा :

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

TMKOC : ‘तारक मेहता का उलटा चश्मा’च्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची डबल मेजवानी, ‘या’ तारखेपासून पाहा अ‍ॅनिमेटेड व्हर्जन

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’साठी संजय लीला भन्साळी घेणार मोठा निर्णय, आलिया भट्ट स्विकारणार हा बदल?

Published On - 10:41 am, Mon, 19 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI