‘पैसा नसेल तेव्हा तुमची लायकी…’, गोविंदाचं कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कसं आहे नातं?

Govinda with family : पैसा सर्वकाही सांगतो..., गोविंदा त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत रॉयल आयुष्य जगत आहेत, पण कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कसं आहे अभिनेत्याचं नातं?

'पैसा नसेल तेव्हा तुमची लायकी...', गोविंदाचं कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कसं आहे नातं?
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 2:40 PM

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा आज बॉलिवूडपासून दूर असला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गोविंदा याचे सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीने आणि आनंदाने पाहतात. लहानपणी गरिबी पाहिलेल्या गोविंदा याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान पक्क केलं. आज गोविंदा त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण कुटुंबातील इतर सदस्यांसोबत गोविंदा यांचं नातं कसं आहे. याबद्दल देखील मोठं सत्य समोर आलं आहे.

गोविदां याची भाची आणि अभिनेत्री रागिनी खन्ना गेल्या काही दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रागिनी हिने मोठं सत्य सांगितलं आहे. आजच्या स्पर्धेच्या दिवसांमध्ये पैसा किती महत्त्वाचा आहे… यावर गोविंदा याच्या भाचीने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

रागिनी म्हणाली, ‘खरं सांगायचं झालं तर, जर तुमच्या पैसा आहे तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील योग्य काळजी घेऊ शकता. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमच्यावर उपचार होणार नाहीत. तुमच्या प्रकृतीला देखील पैशांची गरज असते. या जगात पैशांशिवाय आपलं काहीच नाही. असं असताना तुम्ही नातेवाईक आणि मित्रांकडून काय अपेक्षा ठेवता…’

‘तुम्ही काहीही करा, तुम्हाला फक्त पैसा हवा आहे. हे माझ्या आयुष्याचं सत्य आहे. जे मी अनुभवलं आहे. तुमच्याकडे पैसा आहे तर तुमचं कुटुंब आहे, आई – वडील आहेत, नातेवाईक आहेत, शिक्षण आहे. तुमच्याकडे पैसा नसेल तर, तुमची काहीही लायकी नसते.’

इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या पार्टीबद्दल देखील गोविंदा याची भाची राहिनी खन्ना म्हणाली, ‘जर तुमच्याकडे पैसे नसतील तर, तुम्हाला पार्टीमध्ये देखील बोलावत नाहीत. पार्टीत गेल्यानंतर विचारतात तुम्ही कोण आहे?’

मुलाखतीत रागिनी हिला मामा गोविंदा यांच्या प्रसिद्धीचा फायदा झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रागिनी म्हणाली, ‘असं काहीही नाही. ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. मी त्यांची मुलगी आहे. मामांसोबत माझे चांगले संबंध आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत मामा यांचे चांगले संबंध आहेत.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रागिनी खन्ना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.