Video: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडीओ, लेकही गंभीर प्रकरणात तुरुंगात
Video: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांचं धक्कादायक कृत्य समोर... अनेक महिलांसोबत अश्लील कृत्य... लेकही गंभीर प्रकरणात भोगतेय तुरुंगवास..., सध्या सर्वत्र अभिनेत्री आणि तिच्या सावत्र वडिवांची चर्चा...

Video: कर्नाटकात पोलिस महासंचालक (डीजीपी) रँकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा अनेक महिलांसोबत आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रामचंद्र राव हे कर्नाटक पोलिसांमध्ये नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी आहेत. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रामचंद्र राव यांचे अनेक व्हिडीओ सोमववारी व्हायरल झाले. व्हिडीओमध्ये रामचंद्र राव अनेक महिलांसोबत कार्यालयात अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य सरकारने रामचंद्र राव यांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पण रामचंद्र राव यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. व्हिडीओ पूर्णपणे खोटा असून त्यामध्ये काहीच तथ्य नाही.
व्हायरल व्हिडिओनंतर अधिकारी गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी…
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना राव म्हणाले, ‘मी प्रचंड हैराण आहे. व्हिडीओमध्ये काहीच तथ्य नाही. माझं कोणाची काहीही संबंध नाही… ‘, त्यांनी असेही म्हटले की, आजच्या काळात कोणाचाही बनावट व्हिडिओ बनवला जाऊ शकतो आणि ही त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असू शकतं.
Dr. Ramachandra Rao is an IPS officer of DGP rank serving as the Director General of Police at the Civil Rights Enforcement Directorate of Karnataka Government and Sir is so found of doing Women Empowerment in his Office. Well Done @ips_association pic.twitter.com/vc9b16tbcv
— Amar Mishra (@Anti_LJ_Force) January 20, 2026
रिपोर्टनुसार, व्हिडीओ तब्बल आठ वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. यावर रामचंद्र राव म्हणाले, ‘जर भूतकाळाबद्दल सांगायचं झालं तर, सुमारे आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा माझी बेळगावमध्ये नियुक्ती झाली होती…. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओशी माझा काहीही संबंध नाही. अधिकाऱ्याच्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. ‘आम्ही या प्रकरणी तपासणी करु… याबद्दल मला सकाळी माहिती मिळाली. ते कोणत्याही पदावर असले तरी, कायद्याच्या पुढे कोणीच मोठं नाही… आम्ही सखोल तपास करुन योग्य ती कारवाई करु…’ असं देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
अभिनेत्री रान्या राव हिचे सावत्र वडील रामचंद्र राव
आयपीएस रामचंद्र राव हे तेच अधिकारी आहेत, ज्यांची मुलगी आणि अभिनेत्री रान्या राव हिला कर्नाटकातील सर्वात मोठ्या सोन्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. रान्या ही रामचंद्र यांची सावत्र मुलगी आहे. मार्च 2025 मध्ये दुबईहून मुंबईत येत असताना अभिनेत्रीला अटक करण्यात आलं आणि तिच्याकडून 14.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं. अटकेनंतर, जेव्हा एजन्सींनी बेंगळुरूमधील लव्हेल रोडवरील तिच्या निवासस्थानी छापा टाकला तेव्हा तेथूनही मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी रान्या रावच्या घरातून अंदाजे 2.06 कोटी किमतीचे सोने आणि दागिने आणि 2.67 कोटी रोख जप्त केले. प्रकरण आणखी वाढले जेव्हा, अभिनेत्रीचे सावत्र वडील आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांच्यातील कथित संबंधांबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यावर, राज्य सरकारने त्यांना रजेवर पाठवले. पण, पाच महिन्यांनंतर सरकारी नोकरीवर रामचंद्र पुन्हा दाखल झाले. आता अश्लील व्हिडीओ प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
