VIDEO | लेकाला वाचवण्यासाठी श्वेता तिवारी अक्षरशः लोळली, तरीही एक्स नवऱ्याने हिसकावलं

श्वेता तिवारीने आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर करत अभिनववर पलटवार केला आहे (Actress Shweta Tiwari Abhinav Kohli )

VIDEO | लेकाला वाचवण्यासाठी श्वेता तिवारी अक्षरशः लोळली, तरीही एक्स नवऱ्याने हिसकावलं
Actress Shweta Tiwari Abhinav Kohli

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा घटस्फोटित पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यातील वाद वारंवार समोर येत असतात. श्वेता सध्या आपली मुलगी पलक आणि मुलगा रेयांश कोहली यांच्यासोबत राहते. परंतु दुसरा नवरा (आता घटस्फोटित) अभिनवने रेयांशला आपल्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप श्वेताने केला होता. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ श्वेताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केला आहे. यामध्ये श्वेता तिवारी अक्षरशः जमिनीवर लोळल्याचं दिसत आहे. (Actress Shweta Tiwari shares CCTV Footage in Society Ex Husband Abhinav Kohli snatched Son Reyansh)

श्वेता तिवारी हिचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरतंय. रेयांशच्या पालनपोषणावरुन श्वेता आणि अभिनव यांच्यात वाद सुरु आहे. रेयांशला स्वतःसोबत ठेवण्याची अभिनवची इच्छा आहे, तर तो त्याची योग्य देखरेख करु शकणार नाही, असा श्वेताचा दावा आहे. ती लेकाच्या सुरक्षिततेबाबतही चिंतित असते. त्यामुळे ती त्याला वडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.

श्वेता आपल्या मुलाला भेटू देत नाही, असा दावा अभिनव करतो. मात्रा आता श्वेता तिवारीने आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर करत अभिनववर पलटवार केला आहे. त्यात अभिनव जबरदस्ती श्वेताच्या कडेवरील रेयांशला हिसकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मुलाला वाचवण्यासाठी श्वेता अक्षरशः जमिनीवर लोळल्याचं दिसतं. हा व्हिडीओ आपण तात्पुरता शेअर केला असून लवकरच डिलीट करणार असल्याचंही तिने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

(Actress Shweta Tiwari Abhinav Kohli )

कोण आहे श्वेता तिवारी ?

श्वेता तिवारीने 2001 साली ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून करिअरला सुरुवात केली. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची ती विजेतीही ठरली होती. याशिवाय अनेक मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

श्वेता तिवारीने नऊ वर्षांच्या संसारानंतर 2007 मध्ये पहिला पती राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला होता. दारुच्या नशेत राजा मारहाण करत असल्याचं श्वेता सांगत असे.

2010 पासून श्वेता अभिनवला डेट करत होती. 2013 मध्ये श्वेता आणि अभिनव विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता आणि अभिनव यांना मुलगा झाला. मात्र दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात, मुलीच्या विनयभंगाचा आरोप

(Actress Shweta Tiwari shares CCTV Footage in Society Ex Husband Abhinav Kohli snatched Son Reyansh)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI