तारा सुतारिया हिने महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबतच्या ब्रेकअपवर केले शिक्कामोर्तब? थेट सोशल मीडियावर..
अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, यावर दोघांनी माैन बाळगले. यादरम्यानच तारा सुतारिया हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यानंतर ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितेल जाते.

अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तारा सुतारिया हिने वीर पहाडिया याच्यासोबतचे रिलेशन जगजाहीर केले. सारा अली खान हिच्यासोबतच अनेक अभिनेत्रींसोबत वीर पहाडिया याचे नाव जोडले गेले. तारा सुतारिया हिने थेट दोघांचे काही फोटो शेअर करत नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. वीर पहाडिया याचा भाऊ शिखर पहाडिया हा अभिनेत्री जान्हवी कपूर हिला डेट करतो. जान्हवी कपूर आणि शिखर लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते. हेच नाहीतर शिखर पहाडिया अनेकदा बोनी कपूर याच्यासोबतही स्पॉट होताना दिसतो. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर आण शिखर पहाडिया तिरूपती बालाजीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया हे दोघेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. खासदार प्रणिती शिंदे शिखर आणि वीर पहाडिया यांची सख्खी मावशी आहे.
सोशल मीडियावर एपी ढिल्लनच्या मुंबईतील कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिथूनच वीर पहाडिया आणि तारा सुतारिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगताना दिसल्या. कॉन्सर्टदरम्यान तारा रॅपर एपी ढिल्लनसोबत स्टेजवर आली आणि तारा त्याची गळाभेट घेऊन किस घेताना दिसली. ज्यामध्ये व्हिडीओमध्ये वीर पहाडिया हा देखील दिसला. वीरचे रिअॅक्शन खूप जास्त वेगळे होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तिथूनच तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, ब्रेकअपबद्दल यांच्या सतत बोलले जात आहे. मात्र, दोघांनीही यावर भाष्य करणे टाळले असून दोघांचे रस्ते वेगळे झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रेकअपच्या सततच्या चर्चांदरम्यानच आता तारा सुतारिया हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मात्र, ही पोस्ट तिच्या ब्रेकअपबद्दलच्या चर्चांची नाही तर तिने चित्रपटाबद्दल ही पोस्ट शेअर केली.
टॉक्सिक चित्रपटाचे एक पोस्टर शेअर तारा सुतारिया हिने केले. ज्यात तिने म्हटले आहे की, टॉक्सिकच्या टीझरने 24 तासांत सर्व प्लॅटफॉर्मवर 200 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. चाहत्यांना अपेक्षा होती की, तारा सुतारिया वीर पहाडिया याच्यासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर बोलेल. पण तसे झाले नाही. मात्र, तारा सुतारिया हिच्या पोस्टवर कोणत्याही प्रकारची कमेंट किंवा लाईकही शिखर पहाडिया याने केले नसल्याचे सांगितले जातंय. यामुळेच दोघांचे ब्रेकअप झाल्याचे शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.
