वर्षा उसगांवकर यांचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, मी माझ्या आईला घेऊन…
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी धमाकेदार भूमिका केल्या. वर्षा उसगांवकर यांचे खासगी आयुष्यही चांगलेच चर्चेत राहिले असून त्यांना एकही अपत्य नाहीये.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी चित्रपट क्षेत्रात मोठा काळ गाजवला. अगदी कमी वयात त्यांनी अभिनयाला सुरूवात केली. वर्षा उसगांवकर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील जलवा केला. बिग बॉस सीजन 5 मध्येही वर्षा उसगांवकर दाखल झाल्या. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत जास्त आहे. आजही वर्षा उसगांवकर यांचे चित्रपट तेवढ्याच आवडीने बघितले जातात. वर्षा उसगांवकर यांच्या फक्त चित्रपटातील भूमिकाच नाही तर त्यांचे खासगी आयुष्यही कामच चर्चेत राहिले आहे. वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या पतीला सासऱ्यांनी संपत्तीतून बेदखल केले. काही वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरू होते. वर्षा उसगांवकर यांचे सासरे प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा यांनी वर्षा उसगांवकर याच्यासोबतच त्यांच्या मुलालाही संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनी आपली पूर्ण संपत्ती दोन्ही मुलींच्या नावावर केली. यादरम्यान काही आरोपही करण्यात आली.
वर्षा उसगांवकर यांचा मातोश्रीच्या शेजारी बंगला आहे. बाळासाहेब ठाकरे वर्षा उसगांवकर यांचे शेजारी होते. आता नुकताच वर्षा उसगांकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला असून ज्यावेळी मातोश्रीवर वर्षा उसगांवकर आपल्या आईला घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेल्यानंतर नक्कीच काय घडले. याबद्दल पहिल्याच बोलताना वर्षा उसगांवकर या दिसल्या.
वर्षा उसगांवकर यांनी म्हटले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घर शेजारी होते. त्यामुळे मला छान 24 तास पोलिस संरक्षण असायचे. मला कधीही कलानगरमध्ये जानाता भीती वाटली नाही. रात्रीचे दोन चार वाजू देत तिथे पोलिस संरक्षण असायचे. मला ते घरी बोलवायचे आणि छान गोष्टी सांगायचे. त्यांचे कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप जास्त खेळकर होता. मला नेहमी म्हणायचे की, काय गं… गोव्याची मुलगी कसं काय गोव्याहून इथं आलीस.
गोव्याची मुलगी दामूकडे राहतेस.. असे ते कायम बोलायचे. एकदा माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप जोक्स वगैरे सांगितले.. ते बोलायचे की, मी बियर पितो.. दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे. मी त्यावेळी म्हटले बापरे हे बियर पितात आणि असे सांगतात पण… म्हणजे असा गमतीशीर त्यांचा स्वभाव होता. मग ते मिथूनला फोन लावणार याला फोन लावणार.. मग त्यांच्याशी आमचे बोलणे करून देणार, असा त्यांचा स्वभाव होता खूप जास्त छान.. खूप मार्मिक बोलायचे ते मला आवडायचे..
