Yami Gautam | अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत घेतले ‘सातफेरे’!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Yami Gautam | अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत घेतले ‘सातफेरे’!
यामी-आदित्य

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर (Aditya Dhar) यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता (Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony see first photo).

कोरोना काळात बर्‍याच छोट्या-मोठ्या कलाकारांनी लग्न उरकली होती. ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील जानेवारी महिन्यात आपली बाल मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. यामी या वधू वेशामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचे चाहते देखील तिच्या या सोशल मीडिया पोस्टवर सतत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

पाहा यामीची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

(Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony see first photo)

अभिनेत्रीने आपल्या पोस्टची सुरूवात पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या कविताने केली होती, तिने लिहिले आहे, “तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले.” अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, ‘आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने, आज आम्ही लग्न केले आहे, हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्याने आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.’

शुभेच्छांचा वर्षाव

यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ‘उरी’ या सिनेमापासून ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेता वरुण धवनने सर्वात आधी हा फोटो लाईक केला होता.

यामीची कारकीर्द

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी यामी गौतम सध्या 32 वर्षांची आहे. तिचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी झाला. यामी गौतमने ‘उरी’ सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमातही दमदार भूमिका साकारल्या आहेत.

यामी गौतम ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातीतून प्रकाशझोतात आली. त्यानंतर मग तिला 2008-09 मध्ये ‘चाँद के पार चलो’ ही टीव्ही मालिका मिळाली. त्यानंतर मग यामीने मागे वळून पाहिलं नाही. अनेक छोट्या मोठ्या सिरीयल करताना, तिला तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये भूमिका मिळाल्या.

यामीने 2012 मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमातील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला.

ग्लॅमरसोबत लाईफ पार्टनर

यानंतर मग तिने 2015 मध्ये आलेल्या बदलापूर सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर मग तिची काबील सिनेमातील अंध महिलेची भूमिकाही गाजली. मात्र यामी गौतमला ग्लॅमर मिळवून दिलं ते म्हणजे 2019 मध्ये आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) या सिनेमाने. याच सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम एकमेकांना भेटले. त्यांची मैत्री वाढत गेली आणि यामीला ग्लॅमरसोबत आदित्यच्या निमित्ताने लाईफ पार्टरनही मिळाला.

(Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony see first photo)

हेही वाचा :

‘5G’ प्रकरणात जुही चावलाला हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळत ठोठावला 20 लाखांचा दंड!

Photo : यामी गौतमची धाकटी बहीण सुरीली गाजवतेय पंजाबी इंडस्ट्री, पाहा फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI