AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगवर अखेर दिग्दर्शक ओम राऊतने सोडलं मौन

'आदिपुरुष'च्या टीझरला ट्रोल करणाऱ्यांना ओम राऊतचं प्रत्युत्तर

Adipurush: 'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगवर अखेर दिग्दर्शक ओम राऊतने सोडलं मौन
Om Raut on Adipurush trollingImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2022 | 1:17 PM
Share

मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाच्या टीझरवरून विविध मतमतांतरे पहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर या टीझरला अक्षरश: ट्रोल केलंय. काहींना त्यातील VFX पसंत पडले नाहीत तर काहींनी त्यातील भूमिकांच्या लूकवर प्रश्न उपस्थित केला. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. आता सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटाविषयी मीम्स आणि ट्रोलिंग पाहून निराश झाल्याचं ओम राऊतने सांगितलं. किंबहुना प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे आश्चर्य वाटलं नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. कारण त्या गोष्टींचा अंदाज ओम राऊतला होता. प्रेक्षक जेव्हा आदिपुरुष हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहतील तेव्हा त्यातील VFX आणि CGI बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

“माझी निराशा नक्कीच झाली. पण मी आश्चर्यचकीत अजिबात नाही. कारण आम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी बनवला आहे. त्यातील काही दृश्ये तुम्ही कट करू शकता पण मोबाइल फोनवर पाहण्यासाठी तो चित्रपट नाही. अशा गोष्टी मी नियंत्रित करू शकत नाही. मला पर्याय दिला असता तर मी युट्यूबवर कधीच तो टीझर पब्लिश केला नसता. पण ही काळाची गरज आहे. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो टीझर आम्हाला युट्यूबवर पोस्ट करावा लागला,” अशी प्रतिक्रिया ओम राऊतने दिली.

“आमचे सहकारी पार्टनर आणि टी सीरिज स्टुडिओ यांचा युट्यूब चॅनल हा जगातील सर्वांत मोठा आहे. थिएटरमध्ये क्वचित जाणारे प्रेक्षक आम्हाला या चित्रपटाकडे आकर्षित करायचे आहेत. विशेषकरून ज्येष्ठ नागरिक, जे सहसा थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी जात नाहीत आणि अशा ग्रामीण भागातील प्रेक्षक ज्यांच्याजवळ थिएटर नाही. अशा लोकांनी थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट पाहावा, कारण हे रामायण आहे. हा चित्रपट छोट्या स्क्रीन्ससाठी बनलेला नाही. त्यामुळे मला अशा नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल आश्चर्य वाटलं नाही”, असं तो पुढे म्हणाला.

आदिपुरुष हा चित्रपट आयमॅक्स आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.