AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरी सोडून बनली मॉडेल , लग्नासाठी धर्म बदलला अन् नंतर घटस्फोट; मराठी अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत

एक अशी मराठी अभिनेत्री जी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे उद्धवस्त झाली. डॉक्टरी सोडून ती मॉडेल बनली, लग्नासाठी धर्मही बदलला पण अखेर त्याच निर्णयाने तिला उद्धवस्त केलं.

डॉक्टरी सोडून बनली मॉडेल , लग्नासाठी धर्म बदलला अन् नंतर घटस्फोट; मराठी अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत
| Updated on: Dec 17, 2024 | 12:32 PM
Share

अभिनेत्री म्हटलं की तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातही असे बरेच प्रसंग घडत असतात. ज्यामुळे वैयक्तिक आयुष्य उद्धवस्त होतं. असचं काहीसं घडलं एका मराठी अभिनेत्रीसोबत जिचं बॉलिवूडमध्येही नाव आहे. शिवाय ती एक सुपर मॉडेल आहे.

डॉक्टरी सोडून मॉडेल झाली

पहिली भारतीय जिने मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकला अशी अभिनेत्री अदिती गोवित्रीकर. ती एक सुपरमॉडेल आहे. पण आदितीने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे तसेच ती मानसशास्त्रज्ञसुद्धा आहे.

अदितीचा जन्म महाराष्ट्रातील पनवेल येथे झाला. एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि 1996 मध्ये ग्लॅडरॅग्स मेगामॉडेल स्पर्धा जिंकली. तिला मोठं नाव आणि यशही मिळत होतं पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नंतर सगळच संपलं.

मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. आदितीने एकेकाळी आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते. एका रिपोर्टनुसार, अदिती तिच्या वैद्यकीय प्रॅक्टिस दरम्यान तिचा सिनिअर मुफजल लकडावालाच्या प्रेमात पडली होती. हे दोघे जवळपास सहा वर्षे डेट करत होते. 1997 मध्ये जेव्हा अदिती मेडिकल कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली तेव्हा तिने आणि मुफजलने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नासाठी धर्म बदलला

मुफजल वेगळ्या धर्माचा असल्याने तिने लग्न करू नये असे तिच्या पालकांना होते. पण तिने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन आणि धर्म बदलून अखेर लग्न केलं. त्यांनी 1998 मध्ये लग्न केलं. त्यांनी नागरी आणि मुस्लिम कायद्यानुसार विवाह केला. मुफजलसोबत लग्न केल्यानंतर आदितीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नावही बदलून सारा लकडावाला ठेवले. नंतर ते एक मुलगी आणि एका मुलाचे पालक झाले.

घटस्फोटाच्या 15 वर्षांनंतरही पश्चाताप 

मुलाच्या जन्मानंतर आदितीचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ लागले. मुफजलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि अदितीच्या कामाच्या कमिटमेंट्समुळे अडचणी निर्माण होऊ लागल्या. दोघांमधील भांडणाच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यादरम्यान मुफजल ऑस्ट्रेलियाला गेला आणि आदिती तिच्या मुलांसह तिच्या माहेरच्या घरी गेली.

अदिती आणि मुफजल 2008 मध्ये वेगळे झाले आणि अदितीने मुलांचा ताबा स्वतःकडे ठेवला. एका मुलाखतीत आदितीने सांगितले होते की, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण तो होता जेव्हा मी माझे लग्न वाचवू शकले नाही. मला जिंकायला आवडते. मला लहानपणापासून जिंकायचे होते, वर्गात पहिली यायचे. अशा स्थितीत नात्याचे नुकसान सहन करणे माझ्यासाठी कठीण होते. मी विचार करत होते हे माझ्या बाबतीत कसे घडले?’ घटस्फोटाच्या 15 वर्षांनंतरही आदितीला अजूनही या गोष्टीचा पश्चाताप आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.