AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजघराण्यातील मुलगी असूनही अभिनेत्रीचा खडतर प्रवास; 21 व्या वर्षी लग्ना झालं, त्यानंतर मात्र…

LOVE LIFE | वयाच्या २१ वर्षी लग्न तर केलं पण त्याने नाही दिली शेवटपर्यंत साथ, धरला दुसरीची हात... राजघराण्यातील मुलीचा खडतर प्रवास... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

राजघराण्यातील मुलगी असूनही अभिनेत्रीचा खडतर प्रवास; 21 व्या वर्षी लग्ना झालं, त्यानंतर मात्र...
| Updated on: Aug 18, 2023 | 1:16 PM
Share

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : बॉलिवूमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली पण जोडीदाराची साथ शेवटपर्यंत मिळाली नाही. काही अभिनेत्रींचं ब्रेकअप झालं तर, काही अभिनेत्रींनी लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्रींच्या पहिल्या पतीने दुसरीचा हात धरला आणि नव्या संसाराला सुरुवात केली. राजघराण्यातून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीने स्वतःचं स्वप्न तर पूर्ण केलं. पण तिला यश मिळालं नाही. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आहे.

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं जास्त काळू टिकू शकलं नाही. अदिती हिचा पहिला पती सत्यदीप मिश्रा याने अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न केलं आहे. पण अदिती मात्र अद्याप दुसरं लग्न केलेलं नाही.

सत्यदीप आणि अदिती यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सत्यदीप आणि अदिती दोघे एकमेकांना 17 वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या ओळखीचं हळू-हळू मैत्रीत रुपांतर झालं. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात… अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. म्हणून लग्नाच्या दोन वर्षांनंतर सत्यदीप आणि अदिती यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2017 मध्ये सत्यदीप आणि अदिती यांचा घटस्फोट झाला.

अदिती हिच्या पहिल्या पतीने लग्न करत दुसरा संसार थाटला आहे. तर अदिती अद्याप एकटी आयुष्य जगत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण नात्याबद्दल अभिनेत्रीने अद्याप मौन बाळगलं आहे.

अदिती राव हैदरी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. आदितीचे आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते.

आदितीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण अभिनेत्रीला हवं तसं यश मिळालं नाही. ‘पद्मावत’ ,’मर्डर 3′, ‘भूमी’, ‘बॉस’, ‘रॉकस्टार, यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साराकत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.