AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न करून अदनान सामी, जावेद जाफरी यांना पश्चात्ताप; का टिकलं नाही नातं?

अदनानशी लग्नानंतरही जेबाने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र 'हिना'ने तिला जी लोकप्रियता मिळवून दिली, ती कायम ठेवू शकली नाही. जेबा बॉलिवूड सोडून पाकिस्तानात गेली. तिथे गेल्यानंतर तिने चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणं सुरू केलं.

'या' पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न करून अदनान सामी, जावेद जाफरी यांना पश्चात्ताप; का टिकलं नाही नातं?
Javed Jaffrey, Zeba Bakhtiar and Adnan SamiImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 19, 2023 | 6:18 PM
Share

मुंबई : गायक अदनान सामी पाकिस्तानातून असला तरी तो आता भारतात स्थायिक आहे. 2016 मध्ये त्याने भारताचं नागरिकत्व स्वीकारलं. सात वर्षांनंतरही त्याच्या नागरिकत्वावरून वाद सुरूच आहे. अदनानने पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न केलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर अदनान आणि जेबा बख्तियार विभक्त झाले. जेबा ही तीच अभिनेत्री आहे, जी ऋषी कपूर यांच्यासोबत ‘हिना’ चित्रपटात झळकली होती. जेबाने वयाच्या 22 व्या वर्षी 1993 मध्ये अदनान सामीशी लग्न केलं होतं. उर्दू मालिका आणि चित्रपटांशिवाय तिने त्याकाळी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. जेबाने 1991 मध्ये बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिने रणधीर कपूर दिग्दर्शित आणि निर्मित ‘हिना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यामध्ये तिने ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं होतं.

‘हिना’ या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये जेबाला चांगली लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतरही तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘हिना’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन वर्षांनंतर जेबाने अदनानशी लग्न केलं. अदनान हा तिच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान होता. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे.

जेबाने अभिनयविश्वात करिअर सुरू करण्याआधीही एक लग्न केलं होतं. 1982 मध्ये सलमान वल्लियानी नावाच्या एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर जेबा आणि सलमान यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या येऊ लागल्या होत्या. नंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका स्थानिक न्यूज एजन्सीनुसार, विभक्त झाल्यानंतर जेबाच्या बहिणीने तिच्या मुलीला दत्तक घेतलं होतं.

जावेद जाफरीशीही लग्न

जेबाने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी कॉमेडियन जावेद जाफरीशी लग्न केलं होतं. 1989 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. मात्र जावेदने लग्नाच्या वृत्ताला पूर्णपणे सीक्रेट ठेवलं होतं. नंतर खुद्द जेबाने सार्वजनिकरित्या जावेदसोबतच्या लग्नाचा खुलासा केला. तेव्हा जावेदनेही लग्न कबूल केलं. मात्र लग्नाच्या वर्षभरातच दोघांचे मार्ग वेगळे झाले.

अदनानशी लग्नानंतरही जेबाने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ‘हिना’ने तिला जी लोकप्रियता मिळवून दिली, ती कायम ठेवू शकली नाही. जेबा बॉलिवूड सोडून पाकिस्तानात गेली. तिथे गेल्यानंतर तिने चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणं सुरू केलं. जेबाने 1995 मध्ये एका उर्दू चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलं होतं. 2008 मध्ये तिने पाकिस्तानात राहणाऱ्या सोहेल खान लेघरीशी चौथं लग्न केलं.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.