AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant: ऋषभ पंतसाठीच्या पोस्टमुळे ट्रोल झाल्यानंतर उर्वशीच्या आईची नवी पोस्ट चर्चेत; ‘स्वत:ची किंमत..’

ऋषभ पंतच्या अपघातानंतर पोस्ट केल्यामुळे उर्वशीची आई ट्रोल; आता टीकाकारांना दिलं सडेतोड उत्तर

Rishabh Pant: ऋषभ पंतसाठीच्या पोस्टमुळे ट्रोल झाल्यानंतर उर्वशीच्या आईची नवी पोस्ट चर्चेत; 'स्वत:ची किंमत..'
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत उर्वशीच्या आईने व्यक्त केली चिंताImage Credit source: Twitter
| Updated on: Jan 05, 2023 | 10:34 AM
Share

मुंबई: क्रिकेटर ऋषभ पंचला देहरादून इथल्या रुग्णालयातून हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं. मुंबईत त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यात येणार आहे. ऋषभला 30 डिसेंबरला कार अपघातात दुखापत झाली होती. या अपघातानंतर ऋषभच्या प्रकृतीसाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत होते. अशातच अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या आईची पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मीरा रौतेला यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ऋषभच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र या पोस्टमुळे त्यांना जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता आणखी एक पोस्ट लिहित त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘सोशल मीडियावरील अफवा एका बाजूला आणि तू स्वस्थ होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचं नावलौकीक करणं दुसऱ्या बाजूला. सिद्धबलिबाबांची तुझ्यावर विशेष कृपा असू दे. तुम्ही सर्वजणसुद्धा प्रार्थना करा’, अशी पोस्ट उर्वशीच्या आईने लिहिली होती. या पोस्टनंतर त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

आता इन्स्टाग्रामवर त्यांनी आणखी एक पोस्ट लिहित टीकाकारांना उत्तर दिलं आहे. स्वत:चा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जर स्वत:ची किंमत माहीत असेल तर दुसऱ्यांनी केलेली निंदा आपल्याला स्पर्शही करू शकत नाही.’

ऋषभ पंत दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी तयार असून त्यामुळे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने बुधवारी दिली. बीसीसीआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला कारण, कोणत्याही व्यावसायिक विमानातून प्रवास करण्याच्या स्थितीत नव्हता.

उर्वशी आणि ऋषभ पंतचा वाद जगजाहीर आहे. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला.

ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीचीही पोस्ट चर्चेत होती. उर्वशीने तिच्या फोटोशूटचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर तिने कॅप्शनमध्ये लिहिलं ‘प्रार्थना करतेय’. उर्वशीने ऋषभसाठीच हे कॅप्शन लिहिलं असावं, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.