स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचे मोडले लग्न, थेट..
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाकडे संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. संगीत, मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम मस्त झाला. मात्र, लग्नाला काही तास शिल्लक असतानाच हे लग्न पुढे ढकलण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लग्न रद्द करण्यात आले.

भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिचे लग्न सांगलीत होणारे होते. स्मृती मानधनाच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू होते. पाहुणे मंडळी पोहोचली. संगीत, मेहंदी आणि हळदही अत्यंत थाटात झाली. भारतीय संघातील महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिच्य लग्नाच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसल्या. त्यांनी खास व्हिडीओही स्मृती मानधनासाठी तयार केला. स्मृती मानधना हिचे संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत लग्न होते. विशेष म्हणजे दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले. पलाशने स्मृती मानधनाला अत्यंत खास पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केला. धमाक्यात संगीत झाले. स्मृती मानधना आणि पलाश यांनी एकमेकांसाठी खास डान्सही केले. मात्र, संगीताच्या कार्यक्रमानंतर असे काही घडले की, थेट लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळी तशी परतली.
सुरूवातीला स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने लग्न पुढे ढकलल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर धक्कादायक खुलासे झाली आणि अखेर स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे थेट जाहीर केले. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न मोडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता स्मृती मानधना आणि पलाश यांच्यानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचाही साखरपुडा मोडला आहे.
हैराण करणारे म्हणजे अभिनेत्रीने साखरपुड्यानंतर नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेथा पेथुराज हिचा साखरपुडा दुबईतील व्यावसायिक राजिथ इब्रान याच्यासोबत झाला होता. लवकरच ती लग्न देखील करणार होती. मात्र, अचानक तिने हे नाते संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. राजिथ इब्रान आणि निवेथा पेथुराज यांचा ऑगस्ट 2025 मध्ये साखरपुडा झाला होता.
सुरूवातीला सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. मात्र, अचानक त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि थेट विभक्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2026 मध्ये ते आपल्या नव्या नात्याची सुरूवात करणार होते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर रोमांटिक फोटो शेअर करत तिच्या रिलेशनबद्दल माहिती दिली होती. मात्र, साखरपुड्याला काही दिवस होताच हा धक्कादायक निर्णय घेतला.
