AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harry Potter : कार्तिक, क्रिती, रणबीर, सैफ, नसीरुद्दीन शाह आणि.. हॅरी पॉटरमध्ये कोण साकारणार व्हॉल्डमॉर्ट ? धमाल स्टारकास्ट समोर

एका व्हायरल AI व्हिडिओमध्ये बॉलिवूड कलाकारांना हॅरी पॉटरच्या जगातील भूूमिकेत दाखवण्यात आलं आहे. कार्तिक आर्यन हॅरी पॉटरच्या भूमिकेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. क्रिती सॅनॉन, संजय दत्त यांसारख्या कलाकारांना विविध भूमिकांमध्ये पाहणे चाहत्यांना आवडले आहे. या कल्पनेने सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ ?

Harry Potter : कार्तिक, क्रिती, रणबीर, सैफ, नसीरुद्दीन शाह आणि.. हॅरी पॉटरमध्ये कोण साकारणार व्हॉल्डमॉर्ट ? धमाल स्टारकास्ट समोर
हॅरी पॉटर बॉलिवूडमध्ये बनला तर ?Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 09, 2026 | 1:04 PM
Share

हॅरी पॉटर आणि त्याचं जादुई जग.. चित्रपट किंवा पुस्तकातून आपल्यापैकी अनेकांनी याची सफर केलीच असेल. जगभरात हॅरी पॉटरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या पुस्तकांनी आणि हॉलिवूडमधील चित्रपटांनी अनेकांना वेड लावलंय. पण हाच हॅरी पॉटर चित्रपट बॉलिवूडमध्ये बनला तर ? हॅरी, हर्मायन, रॉन , हॅग्रिड , स्नेप, प्रो. डम्बलडोअर आणि ज्याचं नाव घ्यायला सगळे कचरातात, त्या व्हॉल्डमॉर्टची भूमिका कोण साकारेल बरं ? सध्या एक AI जनरेटेड व्हिडीओ प्रचंड व्हारल झाला असून सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत्या. हॅरी पॉटरच्या दुनियेत, बॉलिवूडचे कलाकार कसे दिसतील, कोण कुठली भूमिका निभावेल, हे इमॅजिन करून त्यात दाखवण्यात आलं आहे.

या व्हिडिओमध्ये ‘हॅरी पॉटर’ च्या अवतारातील कार्तिक आर्यनचा हे सर्वात मोठे आकर्षण ठरलं आहे. एआयने (AI) त्याचे गोलाकार चष्मे, तो विशिष्ट लूक आणि त्या पात्रातील निरागसपणा इतक्या उत्कृष्टपणे आणि हुबेहूब टिपलाय की, चाहत्यांना कार्तिक या भूमिकेसाठी अगदी योग्य वाटतोयहे. सध्या हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावरच व्हायरल झाला नाही, तर बॉलीवूड आणि हॅरी पॉटरच्या चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे.

चाहत्यांना आवडला हॅरी पॉटरचा हा व्हिडीओ

ही संकल्पना प्रेक्षकांना, विशेषतः हॅरी पॉटरच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. कारण यात बॉलीवूडमधील कलाकारांना ‘हॉगवर्ट्स’च्या जादुई विश्वात अत्यंत अचूकपणे साकारण्यात आलं आहे. जर या इमेज मा ‘एआय’ (AI) द्वारे तयार केल्याचं सांगितलं नसतं, तर या कलाकारांना खरोखर एखाद्या चित्रपटात भूमिका मिळाली आहे का किंवा ‘हॅरी पॉटर’ची बॉलीवूड आवृत्ती खरंच तयार होत आहे का, असा प्रश्न तुम्हालाही क्षणभर नक्कीच पडला असता. एवढ्या त्या इमेजेस हुबेहूब दिसतायत.

सोशल मीडियावर युजर्सनी यावर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांचे असे मत आहे की, कार्तिकची एनर्जी, सहज जुळणारं व्यक्तिमत्व आणि त्याचा स्क्रीन प्रेझेन्स हे हॅरी पॉटरच्या पात्राशी हुबेहूब जुळतं. नेमके याच कारणामुळे त्याचा हा नवा लूक व्हायरल ट्रेंडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे.

हॅरीच्या जगात कोण साकारणार कुठली भूमिका ?

या व्हिडिओमध्ये हॉगवर्ट्सच्या जगातील इतर पात्रांसाठी बॉलीवूडमधील कलाकारांची खूप इंटरेस्टिंग पात्रं दाखवण्यात आली आहे. यात क्रिती सनॉनला हर्माइनी ग्रेंजर, वरुण धवनला रॉन वीझली, रणबीर कपूरला ड्राको मॅल्फॉय आणि सैफ अली खानला सेव्हरस स्नेपच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. तर विख्यात जादूगार आणि हॉगवर्ट्सचे मुख्याध्यापक, प्रो. डम्बलडोअर म्हणून नसीरुद्दीन शाह,  ल्युपिन म्हणून मनोज वाजपेयी, डोलोरेस अम्ब्रिज म्हणून विद्या बालन, बेलाट्रिक्स लेस्ट्रेंजच्या भूमिकेत कंगना रानौत दाखवण्यात आली आहे. या सीरिजमधील सर्वात बयावह जादूगार, लोकांना ज्याचं नाव घ्यायलाही भीती वाटते तो म्हणजे लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट.. त्याच्या भूमिकेत संजय दत्तला AI च्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kronix98700 (@kronix98700)

मात्र हा व्हिडीओ फक्त AIचा क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट असला तरी हॅरी पॉटरच्या चाहत्यांना मात्र तो प्रचंड आवडला आहे. तुम्हाला आवडल का हा व्हिडीओ ?

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा