सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा
Aishwarya Rai Bachchan: सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश... कायम राहावं म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय करते 'या' दागिन्याचा वापर! तामिळनाडू येथील फार जुन्या परंपरेचा अभिनेत्री आजही करते पालन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याच्या तुफान चर्चा रंगल्या आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील कोणत्याच प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा ऐश्वर्या आणि लेक आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबियांपासून वेगळं स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे बच्चन कुटुंबात वाद सुरु आहेत.. अशा चर्चांनी जोर धरला. दरम्यान, ऐश्वर्या राय सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी पालन करत असलेल्या जुन्या परंपरेची देखील चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याच्या बोटात एक अंगठी कायम दिसते. ऐश्वर्या राय कायम ‘व्ही’ आकाराची अंगठी घालते. ज्यामागे एक परंपरा आहे. ऐश्वर्या घालत असलेल्या अंगठीला वडुंगिला किंवा वेंकी असं देखील म्हणतात. ही एक पारंपारिक अंगठी आहे आणि कर्नाटकातील विवाहित स्त्रिया, विशेषतः तुळूमध्ये घातला जाणारा हा पारंपरिक दागिना आहे.
View this post on Instagram
सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… याचं प्रतीक ‘व्ही’ आकारची अंगठी असते… असं मानलं जातं. तुलुनाडूमध्ये स्त्रिया लग्नानंतर ही अंगठी कायम घालतात. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्येही याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते… असं देखील सांगितलं जातं.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय ही बंट समाजातील आहे. जो मातृसत्ताक प्रणालीचं पालन करतो. शिवाय ‘व्ही’ आकाराची अंगठी विवाहीत महिलांचं वाईट गोष्टींपासून रक्षण करते… अशी देखील मान्यता आहे… यावर पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
एक नेटकरी म्हणाला, ‘ही अंगठी दोघांच्या नात्याला वाचवू शकते…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर्व वाईट गोष्टींपासून त्याचं रक्षण होवो…’ सध्या चाहत्यांमध्ये ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
