AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलपरीनंतर आता ऐश्वर्याच्या बॉस लेडी लुकची जगभरात चर्चा, चाहत्यांची फोटोवरून नजर हटेना

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या कान्समधील बॉस लेडी लुकने वेधलं सर्वांचं लक्ष. सोशल मीडियावर फोटोंची होतेय प्रचंड चर्चा.

जलपरीनंतर आता ऐश्वर्याच्या बॉस लेडी लुकची जगभरात चर्चा, चाहत्यांची फोटोवरून नजर हटेना
Image Credit source: Social media
| Updated on: May 24, 2026 | 10:03 AM
Share

Cannes Film Festival : जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये दरवर्षी आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस उपस्थितीमुळे चर्चेत राहणारी ऐश्वर्या राय यंदाही चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. 12 मेपासून सुरू झालेल्या कान्स 2026 सोहळ्यात ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लुकची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी तिने सादर केलेल्या जलपरी प्रेरित लुकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता फेस्टिव्हलच्या क्लोजिंग सेरेमनीतही तिच्या हटके आणि बोल्ड फॅशन स्टेटमेंटची जोरदार चर्चा रंगली आहे.

कान्सच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय एका आकर्षक पांढऱ्या रंगाच्या पँटसूटमध्ये दिसून आली. या आउटफिटमध्ये फेदर आणि लेस डिटेलिंग करण्यात आली होती, ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक अधिक रॉयल आणि एलिगंट दिसत होता. या पँटसूटसोबत तिने परिधान केलेला स्टायलिश ब्लेझर विशेष लक्षवेधी ठरला. ब्लेझरच्या लॅपल्सवर मौल्यवान रत्नांची नक्षी करण्यात आली होती. याशिवाय पंखांनी सजवलेल्या शानदार लुकला एक वेगळाच ग्लॅमरस टच मिळाला. ऐश्वर्याचा हा लुक पाहून चाहत्यांनी तिला लेडी बॉस अशी उपमा दिली असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

हा आकर्षक आउटफिट प्रसिद्ध चिनी डिझायनर Cheney Chan यांनी डिझाइन केला होता. ऐश्वर्याच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे हा लुक आणखी प्रभावी दिसत असल्याची चर्चा फॅशन वर्तुळात रंगली आहे.

आई-मुलीची जोडी ठरली आकर्षक

याआधी कान्सच्या पहिल्या दिवशीही ऐश्वर्याचा लुक चर्चेचा विषय ठरला होता. त्या वेळी ती भारतीय फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेल्या जलपरी शैलीतील गाऊनमध्ये दिसली होती. या गाऊनमधील तिच्या एलिगंट अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली होती. तिच्या या लुकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

याशिवाय ऐश्वर्याच्या आणखी एका पिंक गाऊन लुकचीही खूप चर्चा झाली. या वेळी तिच्यासोबत मुलगी आराध्या बच्चन देखील उपस्थित होती. आई-मुलीची ही जोडी रेड कार्पेटवर आकर्षणाचे केंद्र ठरली. दोघींच्या स्टायलिश आणि सुंदर उपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर अनेकांनी या दोघींच्या नात्याचे आणि त्यांच्यातील बॉन्डिंगचे कौतुक केले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा