AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय-सलमान खानचा ‘तेरी चुनरिया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; चाहते म्हणाले ‘ही जोडी पुन्हा..’

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं एकेकाळी तुफान चर्चेत होतं. या दोघांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघं स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत. सलमान आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केले आहेत.

ऐश्वर्या राय-सलमान खानचा 'तेरी चुनरिया' गाण्यावर जबरदस्त डान्स; चाहते म्हणाले 'ही जोडी पुन्हा..'
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
| Updated on: May 10, 2024 | 4:43 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्या आज एकत्र नाहीत पण त्यांची चर्चा आजही होते. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम करताना सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांची ही रोमँटिक केमिस्ट्री ऑनस्क्रीन तर झळकलीच होती, पण ऑफस्क्रीनसुद्धा ही जोडी तुफान हिट ठरली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत होत्या. मात्र त्यांच्या नात्याचा शेवट काही गोड झाला नाही. आज ऐश्वर्या ही अभिषेक बच्चनची पत्नी आणि आराध्याची आई आहे. तर दुसरीकडे सलमान आजही अविवाहित आहे. या दोघांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्ही क्वचितच आधी पाहिला असेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान आणि ऐश्वर्या स्टेजवर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. ‘सरकी जो सिर से वो धीरे धीरे’ या गाण्यावर सलमान आणि ऐश्वर्याने परफॉर्म केला होता. यावेळी ऐश्वर्याने जांभळ्या रंगाचा सूट तर सलमानने पिवळ्या आणि निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. सलमानने ऐश्वर्याचा दुपट्टा आपल्या गळ्याभोवती घेतला असून दोघंही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘ही जोडी आजवर एकत्र राहिली पाहिजे होती’, असं एकाने म्हटलंय. तर ‘बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडी’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘सलमान आणि ऐश्वर्या ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत प्रेमळ जोड्यांपैकी एक होती’, असंही अनेकांनी म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by fk_editz (@fk_ediitz)

सलमानच्या आक्रमक वागणुकीमुळे नातं मोडल्याचं ऐश्वर्याने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने माझ्यावर रागाच्या भरात हातसुद्धा उचलला होता, अशीही कबुली ऐश्वर्याने दिली होती. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमानने 2010 मध्ये त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “तिने अभिषेकशी लग्न केल्यामुळे मी फार खुश आहे. तो एका चांगल्या कुटुंबातील चांगला मुलगा आहे. ती तिच्या आयुष्यात खुश राहो हीच माझी इच्छा आहे”, असं सलमान म्हणाला होता.

इंडस्ट्रीतील जवळपास 35 वर्षांच्या कारकिर्दीत सलमानचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. मात्र 1990 आणि 2000 दरम्यान त्याचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं नातं त्यावेळी जगजाहीर होतं. मात्र ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर काही गंभीर आरोप केले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.