Aishwarya Rai | ‘ऐश्वर्या रायने आता निवृत्त झालं पाहिजे’; वाढलेल्या वजनावरून नेटकऱ्यांकडून बॉडी शेमिंग

अभिनेत्री ऐश्वर्या रायला नुकत्याच एका कार्यक्रमात पाहिलं गेलं. या कार्यक्रमातील तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी ऐश्वर्याला तिच्या वाढलेल्या वजनावरून आणि बोटॉक्सवरून ट्रोल करत आहेत.

Aishwarya Rai | 'ऐश्वर्या रायने आता निवृत्त झालं पाहिजे'; वाढलेल्या वजनावरून नेटकऱ्यांकडून बॉडी शेमिंग
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 9:13 PM

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला काही महिन्यांपूर्वी मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटात पाहिलं गेलं. या चित्रपटातील ऐश्वर्याच्या लूकचं आणि तिच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर आता ऐश्वर्याने नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करत तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र यासोबतच ऐश्वर्याचा लूक आणि तिचं वाढलेलं वजनसुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषयी ठरला आहे. पॅरिस फॅशन वीकनंतर ऐश्वर्याने एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिच्यासोबतच बॉलिवूडमधील इतर बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र ऐश्वर्या जेव्हा पापाराझींसमोर फोटोसाठी आली, तेव्हा ती बॉडी शेमिंगची शिकार झाली.

या कार्यक्रमात ऐश्वर्याने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. त्यासोबतच मोकळे केस आणि लाइट मेकअपमध्ये ती दिसली होती. यावेळी पापाराझींनी ऐश्वर्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ऐश्वर्याच्या लूक आणि वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल केलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

‘हा ड्रेसच तसा आहे की तिचं वजन वाढलंय’, असा सवाल एकाने केला. तर ‘वाढलेलं वजन आणि वय दोन्ही दिसून येत आहेत. आता ऐश्वर्याने निवृत्त झालं पाहिजे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. काहींनी तर तिची तुलना थेट राखी सावंतशी केली आहे. ऐश्वर्याने तिच्या चेहऱ्यावर बोटॉक्स केलं आहे, असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. बोटॉक्समुळे तिचा चेहरा बिघडल्याचं त्यांनी म्हटलंय.

याआधी ऐश्वर्याच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रॅम्पवर ऐश्वर्याला पहिल्यांदाच ब्लाँड हायलाइट्समध्ये पाहिलं गेलं होतं. शोस्टॉपर ऐश्वर्याने रॅम्प वॉक करताना सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. अनेकांनी तिचं कौतुक केलं. मात्र काही जणांनी ऐश्वर्याला तिच्या वाढत्या वजनावरून ट्रोलसुद्धा केलं. ऐश्वर्याने बोटॉक्समुळे आपल्या नैसर्गिक सौंदर्याची वाट लावली, असं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर तिने माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे यांच्याकडून काहीतरी शिकावं, अशा शब्दांत काहींनी टीका केली होती.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.