AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त ऐश्वर्या होती…अभिनेत्रीला मारहाण करणाऱ्या दिग्दर्शकाला एश्वर्याने धडा शिकवला; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

ऐश्वर्या रायने गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या दिग्दर्शकाविरोधात पाऊल उचललं होतं. दिग्दर्शकाची गर्लफ्रेंड देखील बॉलिवूड अभिनेत्रीच होती. पण तेव्हा ऐश्वर्याने तिच्या बाजूने उभी राहिली आणि तिने त्याच्या चित्रपटाबाबत एक मोठं पाऊल उचललं. त्या अभिनेत्रीने स्वत:च एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

फक्त ऐश्वर्या होती...अभिनेत्रीला मारहाण करणाऱ्या दिग्दर्शकाला एश्वर्याने धडा शिकवला; अभिनेत्रीने सांगितला किस्सा
| Updated on: Feb 19, 2025 | 8:32 PM
Share

ऐश्वर्या राय तिच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखली जाते. शिवाय ती तिच्या मितभाषी आणि शांत स्वभावासाठीही ओळखली जाते. तसेच अनेक वेळा ऐश्वर्याने चुकीच्या गोष्टीसाठीही स्पष्टपणे पाऊल उचल्याचं दिसून आलं आहे. असा एक प्रसंग घडला होता तेव्हा एकट्या ऐश्वर्याने दिग्दर्शकाविरोधात उभं राहण्याची हिंमत केली होती.

ऐश्वर्याने गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या दिग्दर्शकाविरोधात पाऊल उचललं

ही 2018 सालची गोष्ट आहे, त्यावेळी ऐश्वर्या रायने आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या दिग्दर्शकाविरोधात पाऊल उचललं होतं. त्या दिग्दर्शकाची ती गर्लफ्रेंड देखील एक बॉलिवूड अभिनेत्रीच आहे. दिग्दर्शकाकडून होणाऱ्या मारहाणीबद्दलची चर्चा सर्वत्र पसरल्यानंतर त्या अभिनेत्रीला इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीला कोणीही काम देत नव्हतं. कारण तिने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या त्या दिग्दर्शकाविरोधात तो तिला मारहाण करत असल्याचं उघडपणे सर्वांना सांगितलं होतं. तेव्हा मात्र ऐश्वर्या तिच्यासाठी उभी राहिली होती.

फ्लोरा सैनीसाठी फक्त ऐश्वर्या  उभी राहिली

ही अभिनेत्री आहे फ्लोरा सैनी. फ्लोराच्या समर्थनार्थ ऐश्वर्या उभी राहिली होती. एका मुलाखतीत फ्लोरा सैनीने तिच्या बॉयफ्रेंडने केलेल्या मारहाणीबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी फ्लोरा सैनीला कोणीही पाठिंबा दिला नाही, त्यानंतर ऐश्वर्या रायने तिला पाठिंबा दिला. फ्लोरा सैनी तिच्या मुलाखतीत म्हणाली होती की, “जेव्हा मी त्यावेळी शोषणाविरुद्ध आवाज उठवला तेव्हा मला वाटले की मी खूप मोठी चूक केली आहे. कारण त्यानंतर मला इंडस्ट्रीत काम मिळणं बंद झालं. मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य होते, त्यामुळे माझ्यासाठी गोष्टी खूप कठीण झाल्या होत्या.”

View this post on Instagram

A post shared by Flora Saini (@florasaini)

ऐश्वर्याने तो चित्रपट सोडला

फ्लोरा सैनी पुढे म्हणाली, “जेव्हा संपूर्ण जग माझ्या विरोधात उभे होते, तेव्हा फक्त एकच महिला होती जीने मला पाठिंबा दिला. ऐश्वर्या राय, तिच्या पाठिंब्याने मला धैर्य मिळालं. तिने माझ्यासाठी तिचा चित्रपट सोडला. तिच्यासाठी ती खूप छोटी गोष्ट असेल कदाचित पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. आता कदाचित तिला हे आठवतही नसेल, पण मी यासाठी तिच्यावर खूप प्रेम करते.” असं म्हणत फ्लोराने हा किस्सा सांगितला.

खरंतर त्यावेळी फ्लोरा सैनी गौरांग दोशीला डेट करत होती. फ्लोराने त्याच्यावर शोषणाचा आरोप केला होता. गौरांगाने तिला एवढी मारहाण केली होती की त्याने तिचा जबडाही मोडला होता असं मुलाखतीत फ्लोराने सांगितले होते. पण त्यानंतरही फ्लोरा इंडस्ट्रीमध्ये फार कमी दिसली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.