AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn : हा तर महाराष्ट्राचा अपमान, अजय देवगणच्या हिंदी पुळक्यावर नेटकरी भडकले, ट्विटरवर Marathi चा ट्रेंड

हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही यावरुन पुन्हा एकदा वाद पाहायला मिळतोय. हा वाद कुण्या साहित्यिकांमध्ये नाही तर अभिनेत्यांमध्ये सुरु आहे! बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि कन्नड चित्रपटातील अभिनेता किच्चा सुदीप यांच्यात हा वाद सुरु आहे.

Ajay Devgn : हा तर महाराष्ट्राचा अपमान, अजय देवगणच्या हिंदी पुळक्यावर नेटकरी भडकले, ट्विटरवर Marathi चा ट्रेंड
अजय देवगण, अभिनेताImage Credit source: TV9
| Updated on: Apr 29, 2022 | 4:58 PM
Share

मुंबई : हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही यावरुन पुन्हा एकदा वाद पाहायला मिळतोय. हा वाद कुण्या साहित्यिकांमध्ये नाही तर अभिनेत्यांमध्ये सुरु आहे! बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि कन्नड चित्रपटातील अभिनेता किच्चा सुदीप यांच्यात हा वाद सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे या वादात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या (K. Siddaramaiah) यांनीही उडी घेतली. इतकंच नाही तर अजय देवगणच्या भूमिकेबाबत आता सोशल मीडियातूनही त्याच्या समर्थनात आणि विरोधात कमेंट्स उमटत आहेत. तहसीन पुनावाला (Tehseen Poonawala) यांनीही अजय देवगणच्या भूमिकेला विरोध केलाय. ‘तुम्ही मुंबईत राहता आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे की एका भाषेला मराठीसह अन्य भाषेवर आपली राष्ट्रभाषा म्हणता’, असं ट्वीट पुनावाला यांनी केलंय.

कन्नड अभिनेता किचा सुदीपने एका लॉन्च इव्हेंटवेळी म्हटलं होतं की, हिंदा आता राष्ट्रभाषा नाही. त्याच्या या वक्तव्यावर अजय देवगणने निशाणा साधला होता. जर हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट हिंदीत डब करुन का प्रदर्शित करता? असा सवाल अजय देवगणने सुदीपला विचारला होता. इतकंच नाही तर ‘हिंदी आपली मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन’, असंही अजय देवगण म्हणाला.

या वादात उडी घेत तहसीन पुनावालाने अजय देवगणवर निशाणा साधलाय. ‘हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाही, ती एक राजभाषा आहे. तुम्ही जे मत मांडलं त्याबाबत तुम्ही जबाबदार असणं आवश्यक आहे. तसंच अजय देवगण तुम्ही मुंबईत राहता आणि मराठीसह इतर भाषांपेक्षा तुम्ही एका भाषेला आपली राष्ट्रभाषा म्हणता, हा महाराष्ट्राचा अपमान आहे’, असं पुनावालाने म्हटलंय.

अजय देवगणच्या त्या ट्वीटवर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अजय देवगणकडून वादावर पडदा

सोशल मीडियावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आणि हा वाद आता राजकीय वळण घेऊ लागल्यानंतर अजय देवगणने या वादावर पडदा टाकलाय. त्याने एक ट्वीट केलं आहे. ‘हाय किचा सुदीप, तु मित्र आहेस. गैरसमज दूर केल्याबद्धल धन्यवाद. मी नेहमीच चित्रपटसृष्टीचा विचार केलाय. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि प्रत्येकाने आमच्या भाषेचाही आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित, अनुवादात काही राहून गेलं असेल’, असं अजय देवगण म्हणाला.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.