AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nysa Devgn | ‘या मुलीमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे’; निसा देवगणच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ओरहानबद्दलही कमेंट्स केल्या आहेत. 'हा ओरी सर्व स्टारकिड्ससोबत का फिरत असतो', असा प्रश्न एकाने विचारला. तर 'याला दुसरं काही काम नसतं का', असं दुसऱ्या युजरने विचारलं आहे.

Nysa Devgn | 'या मुलीमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे'; निसा देवगणच्या 'त्या' व्हिडीओवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
Nysa DevgnImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2023 | 9:46 AM
Share

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक निसा देवगण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी स्टारकिड्ससोबत डिनर पार्टी तर कधी गेट-टुगेदर.. निसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. रविवारी निसा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत डिनरसाठी बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत खास मित्र ओरहान अवतारमणी ऊर्फ ओरीसुद्धा होता. मात्र कारमधून बाहेर पडताना निसाने असं काही केलं, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि पुन्हा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

पापाराझींनी निसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ती कारचा दरवाजा उघडून बाहेर पडताना दिसतेय. मात्र अचानक ती उडी मारते आणि समोर असलेल्या सुरक्षारक्षकाला तिचा हलका धक्का लागतो. निसाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘या मुलीमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ही पूर्ण वेळ नशेतच असते का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘निसा नेहमीच कुठे ना कुठे धडपडत असते’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ओरहानबद्दलही कमेंट्स केल्या आहेत. ‘हा ओरी सर्व स्टारकिड्ससोबत का फिरत असतो’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘याला दुसरं काही काम नसतं का’, असं दुसऱ्या युजरने विचारलं आहे. ओरहान हा त्याच्या बॉलिवूड स्टारकिड्सच्या मित्रमैत्रिणींमध्ये ओरी म्हणून ओळखला जातो. त्याचे सततचे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून तो काही काम करतो की नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

पहा व्हिडिओ

निसाच्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया

“मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावते की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे. मी म्हणतो की तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते. मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो. मला तर कधी कधी त्यांनी काय लिहिलंय हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे मला आता त्या गोष्टींचा काहीच त्रास होत नाही”, अशी प्रतिक्रिया अजयने एका मुलाखतीत दिली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.