मुलगी न्यासाच्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदाच व्यक्त झाला अजय देवगण; म्हणाला “मला मुलांवर..”

याआधी काजोलनेही एका मुलाखतीत ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. "सोशल मीडियावर 75 टक्के ट्रोलिंगच होत असते. तुम्ही ट्रोल झालात म्हणजे लोकांनी तुमची दखल घेतली. जर तुम्हाला ट्रोल केलं गेलं, म्हणजे तुम्ही प्रसिद्ध झालात," अशी उपरोधिक प्रतिक्रिया तिने दिली होती.

मुलगी न्यासाच्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदाच व्यक्त झाला अजय देवगण; म्हणाला मला मुलांवर..
Ajay Devgn with daughter NysaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 11:26 AM

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र सोशल मीडियावर अनेकदा ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्ससोबत कधी पार्ट्यांमध्ये तर कधी डिनर डेटला, न्यासाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतो. मात्र अनेकदा ती ट्रोलिंगची शिकार होते. सोशल मीडियावर न्यासा देवगणला खूप ट्रोल केलं जातं. त्यावर आता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे.

अजय देवगणची प्रतिक्रिया-

अजय सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अजयला न्यासाच्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावते की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे. मी म्हणतो की तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते.”

हे सुद्धा वाचा

“मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो. मला तर कधी कधी त्यांनी काय लिहिलंय हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे मला आता त्या गोष्टींचा काहीच त्रास होत नाही”, असंही तो पुढे म्हणाला.

मुलांविषयी अजयने सांगितलं, “माझ्या मुलांवर नेहमीच लोकांच्या नजरा खिळलेल्या असतात आणि त्यामुळे मला जास्त चिंता वाटते. मी या गोष्टींना बदलू शकत नाही किंवा ट्रोलिंगला रोखूही शकत नाही. अनेकदा ट्रोलर्स असं काही लिहितात, ज्याची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही. पण आपण काय करू शकतो? जर मी त्याला उत्तर दिलं तर ते प्रकरण आणखी वाढेल.”

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

काजोलची प्रतिक्रिया

याआधी काजोलनेही एका मुलाखतीत ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. “ट्रोलिंग हा सोशल मीडियाचा एक विचित्र भाग बनला आहे, असं मला वाटतं. सोशल मीडियावर 75 टक्के ट्रोलिंगच होत असते. तुम्ही ट्रोल झालात म्हणजे लोकांनी तुमची दखल घेतली. जर तुम्हाला ट्रोल केलं गेलं, म्हणजे तुम्ही प्रसिद्ध झालात. जोपर्यंत ट्रोल केलं जात नाही, तोपर्यंत तुम्ही प्रसिद्धच नाही, असं वाटतं”, अशी उपरोधिक प्रतिक्रिया काजोलने दिली होती.

एक आई असल्याने न्यासाला ट्रोल केल्यास वाईट वाटत असल्याची भावनाही तिने बोलून दाखवली. “अशा ट्रोलिंगचे पोस्ट मी स्वत: पाहते. पण 100 पैकी 2 जण तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात आणि त्याच दोघांची कमेंट प्रकाशझोतात येते. हीच गोष्ट मी माझ्या मुलीला समजावते. जर एखादा व्यक्ती तुम्हाला बोलत असेल की अमुक एक गोष्ट तुमची वाईट आहे, तर त्यात दहा हजार अशीही लोकं आहेत जे तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतात. तुम्ही आरशात जे बघता तेच सर्वांत महत्त्वाचं असतं”, असं काजोल पुढे म्हणाली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.