आता माझी सटकली…, भाषिक वादावर अजय देवगण पहिल्यांदाच बोलला, पहा काय म्हणाला?
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा चित्रपट सन ऑफ सरदार 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळी बोलताना त्याने विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा चित्रपट सन ऑफ सरदार 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे. यावेळी देखील अजय देवगण याने सरदारची भूमिका करताना कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाहीये, या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच असा अंदाज व्यक्त केला जात आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचं खूप मनोरंज करणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलिजवेळी अजय देवगण याने विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं, त्याने सध्या भारतात सुरू असलेल्या भाषेच्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
फिल्म सन ऑफ सरदार 2 च्या ट्रेलर रिलीजवेळी अजय देवगण याला असा प्रश्न विचारण्यात आला की, सध्या भारतामधील अनेक राज्यांमध्ये भाषेसंबंधित वाद सुरू आहे. यावर आपलं मत काय? यावर बोलताना अजय देवगण याने मिष्कील उत्तर दिलं, तुम्ही हा प्रश्न विचारण्यासाठी खूप उशिर केला मी केव्हाचा याच प्रश्नाची वाट पाहात होतो असं अजय देवगण याने म्हटलं आहे, पुढे बोलताना तो म्हणाला की यावर मी तुम्हाला फक्त एकच उत्तर देऊ शकतो, आता माझी सटकली, त्यानंतर अजय देवगण हासायला लागला.
कसा आहे सन ऑफ सरदार 2 चा ट्रेलर?
सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणने पुन्हा एकदा त्याच पॉझिटिव्ह एनर्जीनं सरदारची भूमिका साकारल्याचं दिसत आहे. अजय देवगण सोबतच या चित्रपटात रवी किशन, मुकुल देव आणि विंदु दारा सिंह यांची देखील भूमिका आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच अंदाज येतो की हा चित्रपट फुल्ल ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करणार आहे. 25 जुलै 2025 ला हा चित्रपट चित्रपट गृहात येणार आहे.
सध्या अनेक राज्यांमध्ये भाषेबाबत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, दक्षिणेकडील राज्यात देखील हिंदीला विरोध होत आहे. या सर्वांवर आता अजय देवगण याने आपलं मत व्यक्त केलं आहे.
