संजय लीला भन्साळींच्या मदतीला धावून आला बॉलिवूडचा ‘सिंघम’, पूर्ण केले ‘गंगूबाई…’चे चित्रीकरण!

संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhanali) यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

संजय लीला भन्साळींच्या मदतीला धावून आला बॉलिवूडचा ‘सिंघम’, पूर्ण केले ‘गंगूबाई...’चे चित्रीकरण!
संजय लीला भन्साळी, अजय देवगण
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 1:18 PM

मुंबई : संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhanali) यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अजय देवगण (Ajay Devgn) देखील पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. कोरोनाची प्रकरण वाढत असताना अजय देवगणचे एका दिवसाचे शूटिंग बाकी होते. आलिया कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर संजय लीला भन्साळीचे मोठे नुकसान झाले होते. कारण, आलियाचे देखील एका दिवसाचे शूट बाकी होते आणि तिला कोरोना विषाणूची लागण झाली होती. अशा परिस्थितीत संजय लीला भन्साळी यांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी अजय देवगणने आपली या चित्रपटातील भूमिका वाढवली आहे (Ajay Devgn  will seen in Sanjay leela bhansali upcoming film Gangubai Kathiawadi).

अजय देवगणने आता गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग पूर्ण केले आहे. संजय लीला भन्साळी आणि अजय देवगण यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांचे संबंध अधिक चांगले झाले होते.

वृत्तानुसार ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर दोघांनीही एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला पण तसे होऊ शकले नाही. अखेर या दोघांनी बऱ्याच वर्षानंतर गंगूबाई काठियावाडीमध्ये एकत्र काम केले आहे. या वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी अजयच्या गंगूबाई काठियावाडीमधील व्यक्तिरेखा वाढल्याने खूप आनंदी झाले आहेत.

बाजीराव मस्तानीसाठीही केली होती ऑफर

संजय लीला भन्साळी यांनी अजय देवगणला ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाची ऑफर दिली होती, पण तान्हाजी सुरु असल्यामुळे अजयने या चित्रपटास नकार दिला होता. गंगूबाई काठियावाडीत अजयची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. पण लवकरच दोघे पुन्हा एकत्र काम करणार असून, यामध्ये अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे (Ajay Devgn  will seen in Sanjay leela bhansali upcoming film Gangubai Kathiawadi).

आलियामुळे मोठे नुकसान

अलिया भट्ट नुकतीच कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. ज्यानंतर ती घरी अलगीकरणात आहे. रिपोर्ट्सनुसार संजय लीला भन्साळी यांचे मोठे नुकसान होत आहे. संजय लीला भन्साळी लवकरच गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग संपवण्याची घोषणा करणार होते, पण आलियाला कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी शूटिंगचा फक्त एक दिवस बाकी होता. आलियाच्या एका दिवसाचे शूट पूर्ण करणे म्हणजे 160 क्रू मेंबर्सला एकत्र आणणे.

संजय लीला भन्साळींच्या मागे शुक्लकाष्ट

संजय लीला भन्साळी एखाद्या चित्रपटामुळे त्रस्त होत आहेत, ही पहिलीच घटना नाही. बहुतेक चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण सेट जळाला होता. ‘देवदास’ दरम्यान, त्याचे निर्माते रुग्णालयात दाखल झाले. ‘पद्मावत’ दरम्यान संजयची स्वतःची तब्येत ढासळली होती.

(Ajay Devgn  will seen in Sanjay leela bhansali upcoming film Gangubai Kathiawadi)

हेही वाचा :

पुन्हा एकदा घुमणार ‘जय भवानी…’चा ललकार, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘छत्रपती शिवाजी महाराज’!

Kareena Kapoor Baby Boy Pic : रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला तैमूरच्या भावाचा फोटो, पाहा कसा दिसतो चिमुकला नवाब…

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.