अक्षय कुमारच्या Jolly LLB 3च्या अडचणीत वाढ, चित्रीकरण थांबवण्यासाठी कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचा जॉली एलएलबी 3 हा सिनेमा येत आहे. या सिनेमाची शुटिंग सुरू झाली आहे. राजस्थानच्या अजमेर येथे या सिनेमाची शुटिंग सुरू झाली आहे. त्यामुळे हा सिनेमा कसा असेल? त्यात काय दाखवलं जाणार आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या सिनेमाची शुटिंग सुरू होताच सिनेमासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. या सिनेमाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अक्षय कुमारच्या Jolly LLB 3च्या अडचणीत वाढ, चित्रीकरण थांबवण्यासाठी कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
Jolly LLB 3च्या अडचणीत वाढ
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 3:27 PM

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या बहुप्रतिक्षित Jolly LLB 3 या सिनेमाची शुटिंग सुरू झाली आहे. अक्षय कुमारने स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून शुटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. पण सिनेमाची शुटिंग सुरू झाल्या झाल्याच या सिनेमाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सिनेमाच्या विरोधात अजमेर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सिनेमाचं चित्रीकरण बंद करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेनिर्मात्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अजमेर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंह राठोड यांनी दिवाणी न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या सिनेमातून न्यायालयाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं काम सुरू आहे, अशी तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. सिनेमातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा

Jolly LLB 3 या सिनेमाच्या शुटिंगवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी चंद्रभान सिंह यांनी केली आहे. या पूर्वी या नावाने दोन सिनेमे आले आहेत. या दोन्ही सिनेमात न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या दोन्ही सिनेमावरून हा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आल्याचंही चंद्रभान यांनी म्हटलं आहे.

काही दिवस चित्रीकरण चालणार

या सिनेमाचे चित्रीकरण अजमेरच्या डीआरएम ऑफिस आणि आसपासच्या गावात होत आहे. आगामी काही दिवस ही शुटिंग चालणार आहे. चित्रीकरणाच्या काळातही सिनेमाचे कलाकार हे न्यायपालिका आणि न्यायाधीशांच्या प्रतिष्ठेबाबत गंभीर असल्याचं दिसून येत नाहीये, असंही त्यांचं म्हणणं आहे.

तिसऱ्या पार्टमध्ये हुमा सुद्धा

जॉली एलएलबी आणि Jolly LLB 2 चे निर्माते आता तिसरा पार्ट बनवत आहेत. पहिल्या पार्टमध्ये अरशद वारसी आणि दुसऱ्या पार्टमध्ये अक्षय कुमार दिसले होते. तिसऱ्या पार्टमध्ये दोघेही मुख्य भूमिकेत असतील असं सांगितलं जात आहे. या सिनेमात हुमा कुरैशीचीही भूमिका आहे. हुमा शुटिंगसाठी अजमेरला आल्याचंही सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.