या अभिनेत्रीसोबत होते अक्षय कुमारचे विवाहबाह्य संबंध? समजताच ट्विंकल खन्ना घर सोडून गेली होती, पण….
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव एका अभिनेत्रीसोबत चर्चेत आले होते. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची नावे चर्चेत आली. . हे समजताच ट्विंकल खन्ना इतकी संतापली होती की तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता.

बॉलिवूडमध्ये अनेकदा अभिनेत्यांची नावे अनेक अभिनेत्रींशी जोडले जातात. तसेच अनेक अभिनेत्यांची नावे विवाहबाह्य संबंधांबाबतही बातम्या येतात. त्यात अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार. अक्षयचे नाव कितीतरी अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे.
अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत राहिला आहे. यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. होय एका चित्रपटावेळी अक्षय कुमारचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते या अफवा इतक्या पसरल्या होत्या की यामुळे अक्षय आणि ट्विंकल खन्नामध्येही वाद झाल्याचं बोललं जातं. एवढंच नाही तर ती घर सोडून निघाली होती असंही म्हटलं जातं.
शुटींग सुरू होताच अक्षयने फिल्म सोडली
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुनील दर्शन दिग्दर्शित “बरसात” या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा आणि बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तथापि, फार कमी लोकांना माहिती आहे की अक्षय कुमारला सुरुवातीला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती आणि त्याने शूटिंगही सुरू केले होतं. तथापि, नंतर त्याने हे प्रोजेक्ट सोडलं. आता, चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत याबद्दलचा एक किस्सा सांगितला.
अक्षय कुमार आणि या अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या
त्यांनी खुलासा केला की चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्यात अफेअर असल्याच्या अफवा पसरत होत्या. जेव्हा अभिनेत्याची पत्नी ट्विंकल खन्नाला हे कळलं तेव्हा तिने त्याचे घर सोडले.
एका मुलाखतीत “बरसात” च्या दिग्दर्शकाने या घटनेबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितले की “बरसात” मध्ये अक्षय कुमार मुख्य अभिनेता होता. चित्रपट सुरू होताच, त्यांना त्यांच्या पत्नीसोबत एक “विचित्र समस्या” आली. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत “बरसात” चे शूटिंग आधीच सुरू झाले होते. चित्रपटाचे शूटिंग एकाच वेळापत्रकात होणार होते आणि वेळापत्रकाच्या पाच दिवस आधी, अक्षयने मला फोन करून भेटण्याची विनंती केली.
ट्विंकलने त्यांचे घरही सोडले होते.
मग, मी अक्षयला भेटायला जात असताना, बॉबीच्या मॅनेजरने मला फोन केला आणि त्याच्यासोबत एक चित्रपट बनवण्यास सांगितले. मी त्याला वाट पाहण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अक्षयने शेवटी या प्रोजेक्टमधून स्वत:ला दूर केलं.दिग्दर्शकाने सुनील यांनी हे स्पष्ट केलं की काही चुका झाल्या होत्या. प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारबद्दल अफवा पसरू लागल्या होत्या त्यामुळे ट्विंकलने त्यांचे घरही सोडले होते.
दिग्दर्शकाची अक्षयवरच नाराजी
तसेच ते पुढे हे देखील म्हणाले की, “एक अभिनेता म्हणून तुम्हाला जबाबदार असायला हवे. जर तुमची पत्नी अभिनेत्री असेल, तर तिला इंडस्ट्रीबद्दल सर्व काही माहित असेल आणि तिने सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केले असेल, तर या सर्व गोष्टी व्हायला नको होत्या. या परिस्थितीसाठी प्रियांकाला जबाबदार धरता येणार नाही. मी यासाठी प्रियांका चोप्राला दोष देणार नाही. ती जे तिच्या हिताचे होते ते करत होती.” असं म्हणत दिग्दर्शकाने देखील अक्षयलाच याबाबत जबाबदार धरल्याचं समोर आलं.
