AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | अख्खं बॉलिवूड ‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीला असताना अक्षय कुमारच का गैरहजर? कारण आलं समोर

'गदर 2'च्या प्रचंड यशानंतर शनिवारी मुंबईत ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी उपस्थित होते, मात्र अक्षय कुमार कुठेच दिसला नाही. यामागचं कारण आता समोर आलं आहे.

Akshay Kumar | अख्खं बॉलिवूड 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीला असताना अक्षय कुमारच का गैरहजर? कारण आलं समोर
Akshay Kumar and Sunny DeolImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2023 | 2:52 PM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा या वर्षातील दुसरा हिट चित्रपट ठरला आहे. या यशानिमित्त शनिवारी मुंबईत ‘गदर 2’च्या टीमकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण, संजय दत्त, राजकुमार राव, कार्तिक आर्यन, सारा अली खान, क्रिती सनॉन, शिल्पा शेट्टी असे बरेच कलाकार या पार्टीला उपस्थित होते. मात्र या सर्वांत बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार मात्र कुठेच दिसला नाही.

‘गदर 2’शी ‘OMG 2’च्या टक्करमुळे अक्षय कुमार पार्टीला गैरहजर

सनी देओलच्या ‘गदर 2’सोबत अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्याने त्याने पार्टीला हजेरी लावली नाही, असा अंदाज अनेकजण वर्तवू लागले. 11 ऑगस्ट रोजी ‘गदर 2’ आणि ‘ओह माय गॉड 2’ हे दोन्ही चित्रपट देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. एकीकडे ‘गदर 2’ने 500 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसरीकडे ‘OMG 2’ने 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसवरील या टक्करमुळे अक्षयने सनी देओलच्या पार्टीला जाणं टाळलं, असं म्हटलं जातंय. मात्र खरं कारण यापेक्षा वेगळंच आहे.

अक्षयच्या अनुपस्थितीमागचं खरं कारण

अक्षय कुमार सध्या लखनऊमध्ये त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अक्षयने पार्टीला हजेरी लावली नसली तरी त्याने फोनद्वारे सनी देओलला शुभेच्छा दिल्या होत्या. स्काय फोर्स या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर आणि संदीप केलवानी करत आहेत. यामध्ये अक्षयसोबत निम्रत कौर आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.

याआधी अक्षयने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित प्रेक्षकांचे आभार मानले होते. केवळ ‘OMG 2’लाच नव्हे तर ‘गदर 2’लाही उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे त्याने आभार मानले. ‘ओह माय गदरला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आणि भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट आठवडा दिल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. प्रेम आणि आभार’, असं कॅप्शन देत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.