AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | ‘लाज वाटली पाहिजे, भारतालाही नाही सोडलं’, अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

'कॅनेडियन अभिनेता भारताच्या नकाशावर चालून भारतीयांचा अपमान करतोय. याचा कसा स्वीकार करावा', असं एकाने लिहिलंय. तर 'या लज्जास्पद कृतीसाठी तुला 150 कोटी भारतीयांची माफी मागावी लागेल', अशा शब्दांत दुसऱ्या युजरने फटकारलं.

Akshay Kumar | 'लाज वाटली पाहिजे, भारतालाही नाही सोडलं', अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Akshay KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2023 | 7:38 PM
Share

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्याच्या आगामी उत्तर अमेरिकेच्या टूरसंदर्भातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री दिशा पटानी, नोरा फतेही, मौनी रॉय आणि सोनम बाजवा यांचाही समावेश आहे. अक्षयसह हे सर्व कलाकार एका ग्लोबवर चालताना त्यात दिसत आहेत. मात्र या व्हिडीओवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी अक्षय कुमारला ट्रोल करत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे त्या ग्लोबवरील भारताचा नकाशा. या नकाशावर अक्षय चालताना दिसत असल्याने नेटकरी त्याच्यावर राग व्यक्त करत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयने लिहिलं, ‘उत्तर अमेरिकेत 100 टक्के शुद्ध देसी मनोरंजन आणण्यासाठी एंटरटेनर्स सज्ज आहेत. तुमचा सीट बेल्ट बांधा, आम्ही मार्चमध्ये तुमच्या भेटीला येत आहोत.’ मात्र या व्हिडीओतून अक्षयने भारताचा अपमान केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत.

‘कॅनेडियन अभिनेता भारताच्या नकाशावर चालून भारतीयांचा अपमान करतोय. याचा कसा स्वीकार करावा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या लज्जास्पद कृतीसाठी तुला 150 कोटी भारतीयांची माफी मागावी लागेल’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने फटकारलं. ‘भावा, आमच्या भारताचा थोडा तरी सन्मान कर’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे. काहींनी त्याला ‘कॅनेडियन कुमार’ म्हणत टीका केली आहे.

पहा व्हिडीओ-

अक्षयला नेहमीच त्याच्या नागरिकत्वावरून ट्रोल केलं जातं. याविषयी त्याने एका मुलाखतीत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं. “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मीसुद्धा भारतीयच आहे. मला माझा पासपोर्ट मिळाल्यापासून गेल्या 9 वर्षांपासून मी इथे राहतोय. तेव्हा काय घडलं होतं, कशामुळे घडलं वगैरे वगैरे.. त्याबद्दल मला बोलायचं नाही. माझे चित्रपट चालत नव्हते. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या,” असं तो म्हणाला होता.

“कॅनडाचं नागरिकत्व असलं तरी मी भारतातील सर्व कर वेळेवर भरतो. मी या देशाचा आहे आणि नेहमीच भारतीय असेन,” असंही अक्षय म्हणाला होता.

अक्षयच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘सेल्फी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत इमरान हाश्मीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.