Clash : अक्षयच्या ‘बेल बॉटम’चं प्रदर्शन लांबणीवर; ‘हे’ आहे मोठं कारण

या चित्रपटची तारीख पुढं ढकलल्याची माहिती समोर आली आहे. (Akshay Kumar's 'Bell Bottom' movie postponed)

Clash : अक्षयच्या ‘बेल बॉटम’चं प्रदर्शन लांबणीवर; 'हे' आहे मोठं कारण
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 3:08 PM

मुंबई : अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट यावर्षी 2 एप्रिलला प्रदर्शित होणार होता,मात्र आता या चित्रपटची तारीख पुढं ढकलल्याची माहिती समोर आली आहे. बेल बॉटमची तारीख पुढे ढकलण्याला त्याचाच दुसरा चित्रपट कारणीभूत ठरला आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट याच तारखेच्या आसपास रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय आणि कटरिना कैफसोबत झळकणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगनसुद्धा दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी चित्रपट 2 महिन्यांपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुख्य कारण म्हणजे अक्षयचा सूर्यवंशी हा सिनेमा मार्च आणि एप्रिलमध्ये रिलीज करण्याची तयारी आहे, त्यामुळे अक्षयचे 2 मोठे चित्रपट 30 दिवसात मोठ्या पडद्यावर रिलीज करणं हा मोठा मूर्खपणा ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे.

बेल बॉटम या चित्रपटाचं आत्ता पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे आणि फेब्रुवारीपर्यंत फायनल एडिट करण्याचा प्लॅन आहे. हा चित्रपट फेब्रुवारीच्या मिडपर्यंत तयार होईल आणि जूनमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त वाणी कपूर आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

रणजित तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे वशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी हे निर्माते आहेत. तर चित्रपटाची स्क्रिप्ट आणि बाकीच्या कलाकारांची निवड खूप जोरात सुरू आहे.

अक्षयनं या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केल्यानंतर हा चित्रपट कन्नड चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र अक्षयनं या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं.हा ओरिजनल चित्रपट असल्याची त्यानं सांगितलं.

लॉकडाऊनमध्ये अक्षयनं स्कॉटलंडला जाऊन चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं. एवढंच नाही तर अक्षयनं यावेळी डबल शिफ्टमध्ये काम केलंय. अक्षयनं हे केलं कारण लॉकडाऊनमुळे या कामाला आधीच उशीर झाला होता आणि यामुळे निर्मात्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती,त्यामुळे अक्षयसोबतच संपूर्ण टीमनं डबल शिफ्टमध्ये काम केलं.

संबंधित बातम्या 

Marathi Serial : ‘कुणीतरी येणार येणार गं’, रंग माझा वेगळा मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं आगमन !

अमिताभ बच्चन यांनी विरानुष्काच्या मुलीवर केलं ट्वीट, घराणेशाहीचा आरोप करत नेटकरी भडकले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.