Big News | चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Big News | चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारचा सूर्यवंशी 'या' तारखेला होणार प्रदर्शित?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. सूर्यवंशी चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. (Akshay Kumar’s film ‘Sooryavanshi’ will be released on April 2, 2021)

चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता बातमी अशी आहे की, हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली बनविलेला सूर्यवंशी गुड फ्राइडेला रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यात चित्रपटाच्या रिलीजची तारीख घोषित केली जाईल. रोहित शेट्टी आणि चित्रपटाचे सह-निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट देखील सध्या थिएटरच्या मालकाशी बोलत आहेत.

लॉकडाउननंतर रिलीज होणारा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल. अक्षय कुमार 9 तारखेला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करू शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे की, 9 तारीख अक्षयसाठी खूप लक्की आहे. चित्रपटाचे टीझर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाले होते. 24 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती. सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

Urmila Matondkar B’day | उर्मिला मातोंडकरच्या करिअरवर जेव्हा राम गोपाल वर्मामुळे टाच आली

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

(Akshay Kumar’s film ‘Sooryavanshi’ will be released on April 2, 2021)

Published On - 9:59 am, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI