Samrat Prithviraj: महिन्याभराच्या आत अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ ओटीटीवर

जवळपास 300 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 11 कोटींची कमाई केली. मात्र पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणं या चित्रपटासाठी अवघड ठरलं.

Samrat Prithviraj: महिन्याभराच्या आत अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' ओटीटीवर
Samrat Prithviraj
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 29, 2022 | 3:34 PM

अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका असलेला सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता येत्या 1 जुलैपासून तो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद, मानव विज, आशुतोष राणा आणि साक्षी तंवर यांच्या भूमिका आहेत. ‘सम्राट पृथ्वीराज’चं दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे, तर निर्मिती यशराज फिल्म्सची आहे. भारतासह 240 देशातील प्राइम सदस्य 1 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट पाहू शकतात. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेसह तामीळ आणि तेलुगू भाषांतील डबिंगसह उपलब्ध आहे. यशराज फिल्म्सशी (YRF) झालेल्या लायसन्सिंग करारानुसार, बंटी और बबली टू आणि जयेशभाई जोरदार यांच्यापाठोपाठ सम्राट पृथ्वीराज ही प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणारी तिसरी फिल्म आहे.

“माझ्या तीन दशकांच्या करिअरमध्ये मी एवढी मोठी ऐतिहासिक भूमिका कधीच केली नव्हती. सम्राट पृथ्वीराज चौहान पडद्यावर साकारू शकलो ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. 1 जुलैपासून ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून ही महान गाथा घराघरांत घेऊन जाण्यास मी उत्सुक आहे आणि या माध्यमातून एक महान भारतीय योद्धा तसंच बलाढ्य राजा असलेल्या पृथ्वीराज चौहान यांची प्रेरणादायी कथा जगभर पोहोचणार आहे याचा मला आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया अक्षय कुमारने दिली.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

थिएटरमध्ये चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही

जवळपास 300 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 11 कोटींची कमाई केली. मात्र पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणं या चित्रपटासाठी अवघड ठरलं. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर महिन्याभरातसुद्धा 100 कोटींची कमाई केली नाही. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, यशराज फिल्म्सला सॅटेलाइट आणि डिजिटल हक्कांच्या विक्रीतून 100 कोटी रुपये मिळाले आहेत. यशराज बॅनरने या चित्रपटातून 50 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें