Dhurandhar 2: क्रूर रेहमान डकैतची ‘धुरंधर 2’मध्ये वापसी? मोठी अपडेट समोर
Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'चा दुसरा भाग येत्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात तो दिसणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु याविषयी आता नवीन अपडेट समोर आली आहे.

Akshaye Khanna Dhurandhar 2 Update: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने 40 दिवसांत तब्बल 1262 कोटी रुपयांची कमाई करून जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. परंतु या सर्वांत अक्षय खन्नाने खरी बाजी मारली आहे. दमदार अभिनय, जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी आणि FA9LA गाण्यावरील त्याचा डान्स.. या सर्व गोष्टींच्या जोरावर त्याने संपूर्ण चित्रपट आपल्या नावे केला. परंतु पहिल्या भागात त्याने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेचा मृत्यू दाखवल्याने तो दुसऱ्या भागात दिसणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु याविषयी आता नवीन अपडेट समोर आली आहे. ‘धुरंधर 2’मध्येही अक्षय खन्ना झळकणार आहे.
‘धुरंधर 2’मध्ये रेहमान डकैतची बॅकस्टोरी
अक्षय खन्नाने ‘धुरंधर’मध्ये क्रूर रेहमान डकैतची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या अखेरीस दाखवलं गेलं की रेहमानचा मृत्यू होतो आणि तिथेच अक्षयची भूमिका संपुष्टात येते. परंतु आता निर्मात्यांनी ‘धुरंधर 2’मध्येही अक्षय खन्नाला पुन्हा आणण्याचा मार्ग शोधून काढला आहे. ‘फिल्मफेअर’च्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की दुसऱ्या भागात त्याच्या भूमिकेची बॅकस्टोरी दाखवण्यात येणार आहे. म्हणजेच ‘धुरंधर’मध्ये जितकं प्रेक्षकांनी रेहमान डकैतबद्दल पाहिलंय, त्याच्या मागची कथा आता त्यांना दुसऱ्या भागात पहायला मिळणार आहे.
आठवडाभर करणार शूटिंग
या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की अक्षय खन्ना लवकरच शूटिंगसाठी सेटवर परतणार आहे. तो जवळपास एक आठवड्यासाठी ‘धुरंधर 2’साठी शूटिंग करणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा एक मोठा सरप्राइजच असेल. यासंदर्भात अद्याप निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाच्या प्रदर्शनाच्या वेळीच निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची तारीख जाहीर केली होती.
‘धुरंधर’च्या पहिल्या भागात अक्षय खन्नाच्या पात्राचा मृत्यू होतो. रणवीर सिंह आणि संजय दत्तच्या पात्रांनी त्याला विश्वासघाताने मारलं होतं. हमजा त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, असं चित्रण करण्यात आलं. परंतु दोघं मिळून रेहमान डकैतचा खात्मा करतात. आता दुसऱ्या भागात त्याची वापसी होत असल्याचं ऐकून चाहते नक्कीच खुश होतील.