Alia Bhatt Ranbir kapoor : रणवीर-आलियाला जुळी मुलं होणार? चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर म्हणाला…

फिल्म कम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरला दोन सत्य आणि एक खोटे यांचा खेळ खेळण्यास सांगितले होते. काही सेकंद विचार केल्यानंतर रणबीर म्हणाला, 'मला जुळी मुलं होणार आहेत...

Alia Bhatt Ranbir kapoor : रणवीर-आलियाला जुळी मुलं होणार? चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर म्हणाला...
Alia Bhatt
Image Credit source: Instagram
दादासाहेब कारंडे

|

Jul 18, 2022 | 8:02 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई-वडील होणार आहेत. नुकतेच ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो बाप बनण्याबाबत मोकळेपणाने बोलला. यादरम्यान, त्याने एक कमेंट केली ज्यानंतर सर्वांना वाटू लागले की तो आणि आलिया ट्विन्स मुलांचे पालक होणार आहेत. फिल्म कम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरला दोन सत्य आणि एक खोटे यांचा खेळ खेळण्यास सांगितले होते. काही सेकंद विचार केल्यानंतर रणबीर म्हणाला, ‘मला जुळी मुलं होणार आहेत, त्यानंतर तो असेही म्हणाला मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे, मी कामातून बराच ब्रेक घेत आहे.’ हे ऐकल्यानंतर रणबीरच्या चाहत्यांनी रणबीर-आलिया जुळ्या मुलांचे आई-वडील होणार असल्याचा अंदाज लावला. जिथे एका यूजरने लिहिले, ‘रणबीरने गेम-प्लेमध्ये सत्य सांगितले’. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले, ‘व्वा, हे आश्चर्यकारक आहे.’

काही दिवसांपूर्वी आलियानेच दिली गूड न्यूज

काही दिवसांपूर्वी आलियाने सोशल मीडियावर हॉस्पिटलचा एक फोटो शेअर करून लिहिले होते, ‘आमचे बाळ… लवकरच येत आहे’. फोटोमध्ये ती अल्ट्रासाऊंड करताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा पती रणबीरही तिच्यासोबत दिसत आहे. रणबीर आणि आलियाने यावर्षी 14 एप्रिल रोजी कुटुंबीय आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची पहिली भेट 2017 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

रणबीरचे आगामी काळात मोठे चित्रपट

रणबीरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो लव रंजनच्या अनटाइटल्ड रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच तो करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित ‘शमशेरा’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यात रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय रणबीर आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपटही चर्चेत आहे. सोशल मीडियावरही त्याचा बराच बोलबाला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें