
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. तरीही अनेकदा रणबीरबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक टिप्पण्या केल्या जातात. रणबीरवर टीका करणाऱ्यांना एका चाहतीने उत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीरला जे लोक ‘रेड फ्लॅग’ (चुकीची व्यक्ती), ‘मम्माज बॉय’ (नेहमीच आईच्या बाजूने राहणारा) आणि ‘वुमनायजर’ (असा पुरुष जो महिलांसोबत अनेक अनौपचारिक लैंगिक संबंधांमध्ये गुंततो) म्हणतात, त्यांना या चाहतीने उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे चाहतीच्या या पोस्टवर आलिया भट्टनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
रणबीरचा चाहतावर्ग मोठा असला तरी असेही अनेक लोक आहेत, जे त्याला नापसंत करतात. एका युजरने सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. रणबीरला रेड फ्लॅग, वुमनायजर आणि मम्माज बॉय असं म्हणणाऱ्यांना एका युजरने सडेतोड उत्तर दिलंय. तिने लिहिलं, ‘हे मजेशीर आहे की ईर्षा करणारे लोक नेहमी रणबीरला रेड फ्लॅग, वुमनायजर आणि मम्माज बॉय म्हणतात. परंतु सत्य हेच आहे की रणबीरने त्याच्या ब्रँडच्या नावात पत्नी आणि मुलीच्याही नावातील सुरुवातीच्या अक्षरांचा समावेश केला आहे. जर याला तुम्ही रेड फ्लॅग म्हणत असाल तर इंटरनेटवर असलेल्या इतर सर्व ग्रीन फ्लॅनपेक्षा हे उत्तम आहे.’
इन्स्टाग्रामवरील या पोस्टला आलिया भट्टने लाइक केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ही पोस्ट अधिक चर्चेत आली आहे. रणबीरवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या पोस्टला आलियाने लाइक केल्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलंय. अनेकांनी आलियाच्या लाइकचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
एका युजरने लिहिलं, ‘अभिनंदन, आलियाला पसंत पडलंय’. तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘त्याला दिखावा करण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे की तो किती प्रामाणिक आणि प्रेमळ आहे.’ कमेंट्समध्ये अनेकांनी आलिया आणि रणबीरच्या जोडीचं कौतुक केलं आहे. हे दोघं लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘लव्ह अँड वॉर’ असं आहे. यामध्ये रणबीर आणि आलियासोबतच विकी कौशलचीही मुख्य भूमिका आहे.