AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेक राहाचे फोटो लीक झाल्यानंतर अशी होती आलिया भट्टची अवस्था; ‘कॉफी विथ करण 8’मध्ये खुलासा

अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती रणबीर कपूर यांनी मुलगी राहाचे फोटो सोशल मीडियावर लीक न करण्याचं आवाहन फोटोग्राफर्स आणि पापाराझींना केलं होतं. असं असूनही राहाचे काही फोटो लीक झाले होते. त्यावेळी आलिया काश्मीरमध्ये शूटिंग करत होती. फोटो पाहून तिला अचानक रडू कोसळलं.

लेक राहाचे फोटो लीक झाल्यानंतर अशी होती आलिया भट्टची अवस्था; 'कॉफी विथ करण 8'मध्ये खुलासा
Alia BhattImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2023 | 10:10 AM
Share

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’मध्ये दर आठवड्याला नवनवीन सेलिब्रिटी येतात. त्यांच्यासोबत करण अनेक मुद्द्यांवर गप्पा मारतो. सेलिब्रिटींच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या शोमधील गप्पांमधून उघड होतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट्ट यांनी हजेरी लावली होती. वहिनी-नणंदच्या या जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. ही इच्छा करण जोहरच्या शोच्या माध्यमातून अखेर पूर्ण झाली. यावेळी दोघींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. आलियाची मुलगी राहाचा फोटो जेव्हा लीक झाला होता, त्याविषयीही तिने शोमध्ये प्रतिक्रिया दिली.

‘कॉफी विथ करण 8’मध्ये करीना, आलिया आणि करणने त्यांच्या मुलांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. करणने सांगितलं की त्याची दोन्ही मुलं तैमुरसोबत खूप खेळतात. तो असंही म्हणाला की करीना जेव्हा व्हॉट्स ॲप ग्रुपवर सक्रिय होते, बोलू लागते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. यावेळी करणने आलियाला प्रश्न विचारला की जेव्हा राहाचे फोटो व्हायरल झाले होते, तेव्हा ती नाराज का झाली होती?

काय म्हणाली आलिया?

करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना आलिया म्हणाली, “त्यावेळी मी काश्मीरमध्ये शूटिंग करत होती. चित्रपटाचं ते शेड्युल शूट करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं कारण राहाच्या जन्मानंतर मी पहिल्यांदाच शूटवर परतले होते. तुमच्या शरीराला पुन्हा कामाला लावणं खूप कठीण असतं. मी रात्रभर झोपू शकत नव्हते कारण राहाला स्तनपान करावं लागत होतं आणि पुन्हा सकाळी मी शूटिंगसाठी धावत होते. मला अजूनही आठवतंय की त्यावेळी मी रणबीरला कॉल केला आणि म्हणाले की माझ्यासाठी हे करणं खूप कठीण होतंय. तेव्हा रणबीरने माझी साथ दिली. त्याने त्याचं काम पुढे ढकललं आणि माझ्या मदतीसाठी तो सेटवर आला.”

अन् आलियाला रडू कोसळलं

“रणबीर राहाची काळजी घेत होता, त्यामुळे मी थोडी निवांत झाले होते. पण त्यावेळी माझ्या मनात खूप साऱ्या भावनांचा गोंधळ होतं. मुलीला असं सोडून कामावर जाणं आणि सगळ्या गोष्टी एकाच वेळी सांभाळणं माझ्यासाठी कठीण होतं. ती अपराधीपणाची भावना माझ्या मनात वाढत जात होती. जेव्हा शूटिंगनंतर मी परत येण्यासाठी प्रवास करत होती तेव्ही मी एक फोटो सोशल मीडियावर पाहिला. त्यात राहाच्या चेहऱ्याची एक बाजू दिसत होती आणि ते पाहून मला रडू कोसळलं,” असं तिने पुढे सांगितलं.

“मी यासाठी रडले नव्हते की लोकांनी राहाचा चेहरा पाहिला किंवा तिचे फोटो लीक झाले. पण त्यावेळी माझ्या मनात जणू भावनांचा पूरच आला होता. मी ज्या लोकांवर खूप प्रेम करते, त्यांच्याबद्दल मी खूप संवेदनशील असते. म्हणूनच माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू तरळले”, असं आलियाने स्पष्ट केलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.