Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 कोटींची कार; 250 कोटींचे घर; ही अभिनेत्री जगतेय राणीसारखं आयुष्य, बॉलिवूड पडद्यावर पतीसोबत केलाय रोमॅन्स

ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या 19 व्या वर्षापासून काम करत आहे. अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी ते राणीसारखं आयुष्य जगणारी ही अभिनेत्री कोण?

3 कोटींची कार; 250 कोटींचे घर; ही अभिनेत्री जगतेय राणीसारखं आयुष्य, बॉलिवूड पडद्यावर पतीसोबत केलाय रोमॅन्स
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 10:10 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जिला खरंतर स्टारकिड म्हणूनही ओळखलं जातं. तिने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पन केलं त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने हिटवर हिट सिनेमे देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

3 कोटींच्या कारपासून ते बीएमडब्ल्यू पर्यंत कारचा ताफा

या अभिनेत्रीच्या चित्रपटांची जेवढी चर्चा झाली तेवढीच तिच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. लग्नाआधीही आणि लग्नानंतरही ही अभिनेत्री अगदी राणीसारखंच आयुष्य जगत आहे. शिवाय तिला कारचीही प्रचंड आवड आहे.

3 कोटींच्या कारपासून ते बीएमडब्ल्यू पर्यंतच्या कार तिच्याकडे आहेत. हीअभिनेत्री आहे आलिया भट्ट. आलियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटापासून केली. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवनसोबत दिसली होती.

यशस्वी अभिनेत्रीची रॉयल लाइफ

या चित्रपटानंतर आलियाने मागे वळून पाहिले नाही आणि सलग अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. या अभिनेत्रीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. आता आलिया इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया भट्टने 2023 मध्ये 3.2 कोटी रुपयांची रेंज रोव्हर खरेदी केली. त्याच्याकडे 1.3 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू 7 सिरीज कार देखील आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक गाड्या आहेत, ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे.

रणबीरपेक्षाही आलियाची संपत्ती जास्त

आलियाचे रणबीरसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या लाइफबद्दलची चर्चा जास्तच होऊ लागली. शिवाय हे कपल म्हणजे सर्वांचे आवडे कपलही बनले. या कपलनंतर त्यांची मुलगी राहादेखील आता तेवढीच प्रसिद्धी झोतात असते. शिवाय या कपलकडे अनेक मालमत्ताही आहे. दोघांनीही अलिकडेच 250 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे.

हे जोडपे अनेकदा त्यांच्या घराच्या परिसरात दिसतात. एका वेबसाइटनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 550 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, आलिया जाहिरातींमधूनही ती भरपूर कमाई करते.

View this post on Instagram

A post shared by Vogue (@voguemagazine)

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

आलिया आणि रणबीरमध्ये कोणाची संपत्ती जास्त आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आलियाची एकूण संपत्ती रणबीरपेक्षा जास्त आहे. रणबीर कपूरची एकूण संपत्ती 345 कोटी रुपये आहे आणि आलियाची 550 कोटी रुपये आहे. आलियाकडे लाखो रुपयांच्या बॅग्ज आणि ड्रेसेस आहे. आलियासोबतच चाहते तिची गोंडस मुलगी राहावरही खूप प्रेम करतात.

सोशल मीडियावरही आलियाची चांगली फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर 86 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आलियाचे नाव बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही समाविष्ट आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.