AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेबद्दल अलका कुबल यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या “महायुती सरकार..”

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना 'लाडकी बहीण योजने'बद्दल मत मांडलं. त्याचप्रमाणे त्या विकी कौशलच्या 'छावा'बद्दलही मोकळेपणे व्यक्त झाल्या.

लाडकी बहीण योजनेबद्दल अलका कुबल यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या महायुती सरकार..
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अभिनेत्री अलका कुबलImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 11, 2025 | 9:17 AM
Share

जळगावातील खानदेश महोत्सवात दिव्यांग विद्यार्थ्यांचा डान्स पाहताना अभिनेत्री अलका कुबल भावूक झाल्या. उडान दिव्यांग फाउंडेशनचे विद्यार्थी या महोत्सवाद नृत्य सादर करत होते. अगदी सामान्य मुलांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या गीतांवर हातवारे आणि हावभाव करत नाचताना पाहून अलका कुबल भारावून गेल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचं सादरीकरण पाहून त्या थक्क झाल्या होत्या. या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटोसुद्धा काढला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांचं सादरीकरण केलं. “मुलांचे पालक आणि शिक्षक यांनी ज्या पद्धतीने हा डान्स बसवला होता, ते पाहून मी खूप भावूक झाले. ही मुलं नशीबवान आहेत की त्यांना असे पालक मिळाले आहेत. देवाची मुलं, स्पेशल चाइल्ड अशी ही मुलं असतात,” अशा शब्दांत अलका यांनी भावना व्यक्त केल्या.

सासू-सासऱ्यांबद्दल झाल्या व्यक्त

जळगावातील या कार्यक्रमात अलका कुबल यांनी त्यांच्या सासरच्या आठवणींनाही उजाळा दिला. “1991 मध्ये ‘माहेरची साडी’ हा चित्रपट केला. त्यानंतर प्रेक्षक रसिकांनी खूप प्रेम दिलं, आशिर्वाद दिले. ‘माहेरची साडी’ या चित्रपटात जसे माझे सासू-सासरे होते, त्याउलट प्रत्यक्षात लग्नानंतर मला प्रेमळ सासू सासरे, प्रेमळ नवरा मिळाला, मुलीसुद्धा तशाच. हे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी करिअर करू शकले. शूटसाठी 11-11 महिने घराबाहेर होते. मात्र माझ्या सासूने सर्व घर सांभाळलं होतं. मुलींवर चांगले संस्कार केले. त्यामुळे बाहेर असतानासुद्धा मी निर्धास्त राहिले. फक्त कुठला सणवार, किंवा मुलींचे वाढदिवस असले की मी घरी यायचे. आतापर्यंत मी जवळजवळ 350 चित्रपट केले. परमेश्वराने मला खूप यश दिलं, लोकांनी रसिकांनी मला खूप प्रेम दिलं,” असं त्या म्हणाल्या.

हुशार विद्यार्थ्यांची मदत करण्याची सरकारकडे मागणी

यावेळी अलका कुबल इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. “पॉईंट-पॉईंट मार्कांसाठी मुलांचे ॲडमिशन हुकतात. जात धर्म येतं. काही जणांना हे कदाचित आवडणार नाही, पण मला अनेकदा वाटतं की मेरिट बघावं, स्किल बघावेत आणि आर्थिक परिस्थिती नसेल तर सरकारने मदत करावी. मुलं किती हुशार असतात. मात्र कोणी रिक्षावाला असेल, कोणी हातगाडेवाला असेल तर परिस्थिती नसल्यामुळे त्यांची मुलांना प्रवेश घेऊ शकत नाहीत. माझ्या मुलीची दीड वर्षांची फी 1 कोटी रुपये आहे. ही इतकी फी साधा रिक्षावाला आणि हातगाडीवाला कसं भरू शकतील? त्यामुळे चांगले मार्क मिळाले असतील तर अशा विद्यार्थ्यांना सरकारने मदत करावी. शासनाने मेरिट बघावं आणि त्यांना आवर्जून प्रोत्साहन द्यावं,” अशी मागणी त्यांनी केली.

‘छावा’बद्दल काय म्हणाल्या?

“यश सर्वांनाच मिळतं, मात्र यश मिळाल्यावर जमिनीवर पाय असणं खूप महत्वाचं असतं. आजच्या काळामध्ये तुमच्याकडे पैसा किती आहे हे कोणी बघत नाही, मात्र तुमच्याकडे माणसं किती आहेत हे फार महत्वाचं आहे,” असंही मत अलका यांनी यावेळी मांडलं. यावेळी त्यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाबद्दलही प्रतिक्रिया दिली. “छावासारखे चित्रपट यायला हवेत. यानिमित्ताने एक चांगली कलाकृती लोकांसमोर आली. महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये जागरूकता आली. सतत आपण डान्स गाण्याचे कार्यक्रम बघत असतो, पण असं काही ऐतिहासिक आलं तर उपदेश देण्यापेक्षा आपण त्यांना धडा देतो असं मला वाटतं,” असं त्या म्हणाल्या.

‘लाडकी बहीण योजने’बद्दल काय म्हणाल्या?

राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “हे सरकार महिलांसाठी खूप चांगलं काम करतंय. लाडकी बहीण योजना जिंदाबाद.” अलका कुबल या लवकरच ‘वजनदार’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.