AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Allu Arjun: 100 कोटींचे घर, सात कोटींची व्हॅनिटी आणि महागड्या कार इतक्या कोटींचा मालक आहे अल्लू अर्जुन

अभिनेत्याचे घर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये आहे. ज्युबली हिल्स हे हैदराबादचे सर्वातमहागडा परिसर मानला जातो . अल्लू अर्जुनचे घर आतून खूप सुंदर आहे. त्याचे इंटीरियर खूप छान केले आहे. आठ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या आलिशान घरात खासगी स्विमिंग पूलही आहे.

Allu Arjun: 100 कोटींचे घर, सात कोटींची व्हॅनिटी आणि महागड्या कार इतक्या कोटींचा मालक आहे अल्लू अर्जुन
Allu ArjunImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2022 | 4:21 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीततील एक उत्तम, सशक्त कलाकार अल्लू अर्जुन(Allu Arjun) जो बॉलीवूड(Bollywood) कलाकारांच्या पेक्षा कशातही कमी नाही. तेलगू चित्रपटांचा(Telegu Movie) सुपरस्टार मानला जाणारा अल्लू अर्जुन केवळ अभिनयानेच मोठा नाही. तर संपत्तीनेही कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. दाक्षिणात्य चित्रपटांच्या सोबतच तो हिंदी चाहत्यांच्यामध्येही खूप लोकप्रिय आहे. यातच ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटानंतर अल्लू अर्जुन आपल्या कलेच्या बळावर देश-विदेशात चमकत आहे. दिवसेंदिवस तो यशाचीशिखरे गाठताना दिसून येत आहे. बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करण्यासोबतच या चित्रपटातून अल्लू अर्जुनने स्वतःचे अनेक रेकॉर्ड तयार केले आहेत.

या चित्रपटातून दाखवले अभिनय कौशल्य

‘आर्या’, ‘येवडू’, ‘ना इल्लू इंडिया’ आणि पुष्पा द राइज सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपली अभिनयाने स्वतःला सिद्ध करणारा अल्लू अर्जुन लक्झरी जीवनशैली जगतो. अल्लू अर्जुनची गणना साऊथ सिनेसृष्टीतील श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते.’पुष्पा’ स्टार अभिनेता सध्या एका चित्रपटासाठी 125 कोटी रुपये मानधन घेत आहे. अल्लू अर्जुनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे, जी तो चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींमधून कमावतो. यामध्ये ब्रँड एंडोर्समेंटचा देखील समावेश आहे.

एका महिन्यात इतके कोटी रुपये कमवा

रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने त्याच्या सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. अभिनेत्याच्या एका महिन्याच्या कमाईबद्दल बोलायचे तर तो 30 दिवसांत दोन कोटी रुपये कमावतो. यानुसार अल्लू अर्जुनचे वार्षिक उत्पन्न 24 कोटी रुपये होते. चित्रपटांसोबतच अल्लू अर्जुन अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम करतो, ज्यातून तो सुमारे चार कोटी रुपये कमावतो. चित्रपट आणि एड्समध्ये काम करण्यासोबतच अल्लू अर्जुनने हैदराबादमधील आरोग्य सेवा केंद्रातही गुंतवणूक केली आहे.

आठ हजार स्क्वेअर फूटचे आहे घर

अभिनेत्याचे घर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये आहे. ज्युबली हिल्स हे हैदराबादचे सर्वातमहागडा परिसर मानला जातो . अल्लू अर्जुनचे घर आतून खूप सुंदर आहे. त्याचे इंटीरियर खूप छान केले आहे. आठ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या आलिशान घरात खासगी स्विमिंग पूलही आहे. अल्लू अर्जुनचा बंगला आतून आणि बाहेरून खूप आलिशान दिसतो, ज्याची किंमत 100 कोटी आहे. हैदराबादमधील या घराशिवाय अल्लू अर्जुनकडे मुंबईत टू बीएचके अपार्टमेंटही आहे, जो त्याने 2015 मध्ये खरेदी केला होता.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.