AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम असल्यामुळे GF ने तोडलं 5 वर्षांचं नातं, केलं दुसऱ्या मुलाशी लग्न… गायकने व्यक्त केले दु:ख

प्रसिद्ध सिंगर आणि म्युझिक कंपोजर अमाल मलिकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने फक्त त्याच्या धर्मामुळे त्याच्याशी नातं तोडलं. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने फोनवर त्याच्यासोबतचं 5 वर्षांचं नातं संपवल्याचं सांगितलं.

मुस्लिम असल्यामुळे GF ने तोडलं 5 वर्षांचं नातं, केलं दुसऱ्या मुलाशी लग्न... गायकने व्यक्त केले दु:ख
Bollywood SingerImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 13, 2025 | 4:23 PM
Share

काही महिन्यांपूर्वी अमाल मलिक आपल्या कुटुंबाशी नातं तोडण्याच्या कारणामुळे चर्चेत होता. त्याने एक पोस्ट शेअर करून सांगितलं होतं की तो आई-वडील आणि भाऊ यांच्यामुळे कुटुंबाशी नातं तोडत आहेत. मात्र, ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याने ती डिलीट केली होती. आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमी लाइमलाइटपासून दूर ठेवणारा सिंगर आणि म्युझिक कंपोजर अमाल मलिक याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केले.

सिद्धार्थ कननशी बोलताना अमाल मलिक म्हणाला की, तो एका मुलीशी 5 वर्षे नात्यात होता. पण तिने फक्त त्याच्या मुस्लिम धर्मामुळे त्याला सोडलं. सिंगर म्हणाला की, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबाबत नेहमीच अडचण होती. म्हणून तिने मला सोडून दिले.

वाचा: रेड लाईट एरियात अमानुष छळ, बाहेर येण्यासाठी मोजली इतकी किंमत, 29 वर्षांची प्रसिद्ध हसिना आहे तरी कोण?

5 वर्षे नात्यात होता सिंगर

अमाल मलिक म्हणाला की, तो 2014 ते 2019 या काळात त्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. पण तिच्या कुटुंबाला ती चित्रपटसृष्टीशी संबंधित कोणालाही डेट करावे हे मान्य नव्हतं. तिच्या कुटुंबाने आम्हाला कधीच स्वीकारलं नाही.

तिने पळून जाण्यास दिला होता होकार

तो पुढे म्हणाले, “मी त्या वेळी ‘कबीर सिंह’ चित्रपटातील ‘पहला प्यार’ गाण्यावर काम करत होतो आणि त्याचदरम्यान माझं ब्रेकअप झालं. एके दिवशी तिने फोन केला आणि सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे. तिने मला सांगितलं की, जर मी सांगितलं तर ती माझ्यासोबत पळून जाईल, पण त्या वेळी माझ्या मनात ‘DDLJ’ चा SRK जागा झाला. मी तिला सांगितलं की, जर तुझ्या पालकांना माझ्या कामाचा आणि माझ्या धर्माचा आदर करता येत नसेल, तर मी तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.